26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeराष्ट्रीयपंतप्रधान मोदींकडून शिंदे-फडणवीस यांना शुभेच्छा

पंतप्रधान मोदींकडून शिंदे-फडणवीस यांना शुभेच्छा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : गुरुवारी राजभवनमध्ये शिंदे आणि फडणवीस यांचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. केंद्रीय नेतृत्वाच्या आग्रहानंतर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर सर्वसामान्यांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत शिंदे-फडणवीस यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

शिंदे तळागाळातील नेते : मोदी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन! तळागाळातील नेता, तो आपल्यासोबत समृद्ध राजकीय, विधिमंडळ आणि प्रशासकीय अनुभव घेऊन येतो. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी तुम्ही एकत्र काम कराल अशी अपेक्षा आहे, असे ट्विट एकनाथ शिंदे यांच्यासाठी नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

देवेन्द्र प्रत्येक कार्यकर्त्यासाठी प्रेरणा आहेत : मोदी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा.. तुम्ही भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी प्रेरणा आहात. तुमचा अनुभव महाराष्ट्र सरकारसाठी मोठा ठेवा आहे. मला विश्वास आहे की, तुम्ही महाराष्ट्राची प्रगती आणखी ताकदीने कराल, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या