19.1 C
Latur
Saturday, January 16, 2021
Home राष्ट्रीय पंतप्रधान मोदींच्या संपत्तीत गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ

पंतप्रधान मोदींच्या संपत्तीत गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ

अमित शहांच्या संपत्तीत घट ; मोदींच्या नावावर कर्ज नाही

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपत्तीत गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. तर गृहमंत्री अमित शाह यांच्या संपत्तीत घट झाली आहे. १२ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान कार्यालयाकडे दाखल झालेल्या संपत्तीच्या विवरणातून ही बाब समोर आली आहे.

पीएमओच्या माहितीनुसार, ३० जून रोजी पंतप्रधान मोदींची निव्वळ संपत्ती २.८५ कोटी रुपये होती. यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ३६ लाख रुपयांनी वाढ झाली आहे. गेल्यावर्षी त्यांची संपत्ती २.४९ कोटी रुपये होती. त्यांच्या बँक खात्यात ३.३ लाख रुपये जमा झाल्याने तसेच गुंतवणुकीची ३३ लाख रुपयांची रक्कम खात्यात जमा झाल्याने ही वाढ दिसून येत आहे.

दरम्यान, जून महिन्याच्या शेवटी पंतप्रधान मोदींकडे ३१,४५० रुपये रोख रक्कम होती. तर गांधीनगरच्या एसबीआय बँकेच्या खात्यात २,३८,१७३ रुपये रक्कम होती. त्याचबरोबर याच शाखेत मोदींची मुदत ठेव असून त्यात जमा रक्कम १,६०,२८,९३९ इतकी आहे. पंतप्रधानांकडे ८,४३,१२४ रुपयांची राष्ट्रीय बचत पत्रे (एनएससी), १,५०,९५७ रुपयांच्या एलआयसी पॉलिसीज आणि २०,००० रुपयांचे करबचतीचे इन्फ्रा बॉण्ड्सही आहेत. तर १.७५ कोटी रुपयांची अस्थावर संपत्ती आहे.

कर्ज नाही, गाडीही नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुठलेही कर्ज घेतलेले नाही. त्यांच्या नावावर वैयक्तिक गाडीही नाही. त्यांच्याकडे चार सोन्याच्या अंगठ्या असून त्यांचे एकूण वजन सुमारे ४५ ग्रॅम इतके असून त्याची किंमत १.५ लाख रुपये आहे. त्याचबरोबर गांधीनगरच्या सेक्टर -१ येथे मोदींच्या नावावर ३,५३१ स्वेअर फूटाचा प्लॉट आहे. मात्र,या प्लॉटचे तीन जण मालक असून यामध्ये प्रत्येकाची २५ टक्के भागीदारी आहे. हा प्लॉट २५ ऑक्टोबर २००२ रोजी घेतलेला आहे. त्यावेळी त्याची किंमत १.३ लाख रुपये होती.दरम्यान, गृहमंत्री अमित शाह यांची आजची निव्वळ संपत्ती २८.६३ कोटी रुपये आहे, जी गेल्या वर्षी ३२.४ कोटी रुपये इतकी होती. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुनलेत शाह यांच्या संपत्तीत ४ कोटी रुपयांनी घट झाली आहे.

तीन महिन्यांसाठी वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीला स्थगिती

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,408FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या