25 C
Latur
Friday, January 22, 2021
Home राष्ट्रीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रक्षाबंधनाच्या दिल्या देशवासियांना शुभेच्छा !

पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रक्षाबंधनाच्या दिल्या देशवासियांना शुभेच्छा !

एकमत ऑनलाईन

श्रावणी पौर्णिमेचा आजचा दिवस राखी पौर्णिमा म्हणून देशभर साजरा केला जाणार आहे. रक्षाबंधन हा सण बहीण-भावाच्या नात्यामधील जिव्हाळा जपणारा एक सण आहे. त्यामुळे या दिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधून त्याला तिचं रक्षण करण्याच्या कर्तव्याची आठवण करून देते. या दिवसाच्या मंगपर्वावर भारतामध्ये आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी शुभेच्छा संदेश दिले आहेत. त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून भारतवासियांना आजच्या रक्षाबंधन सणाच्या शुभेच्छा देऊन हा सण आनंदाने साजरा करण्याचं आवाहन केले आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्वीटरच्या माध्यमातून शुभेच्छा देताना रक्षा बंधनाचा सण हा बहीण-भावाच्या प्रेमाचा असल्याचं सांगत या निमित्ताने महिलेचा सन्मान आणि सुरक्षा यासाठी अधिक कटिबद्ध होऊ असं म्हटलं आहे.

Read More  लातूर जिल्ह्यात आणखी १६१ रुग्णांची भर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,415FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या