37.8 C
Latur
Monday, May 29, 2023
Homeकर्नाटकातील धार्मिक स्थळे १ जूनपासून खुली करण्यासाठी पंतप्रधानांना साकडे

कर्नाटकातील धार्मिक स्थळे १ जूनपासून खुली करण्यासाठी पंतप्रधानांना साकडे

एकमत ऑनलाईन

बंगळुरू (वृत्तसंस्था) : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारनं लॉकडाऊनचा निर्णय घेतला होता. सोशल डिस्टसिंग राखलं जावे म्हणून धार्मिक स्थळेही बंद करण्यात आली होती. देशात लॉकडाऊन लागू होऊन आता दोन महिने झाले आहेत. सरकारनं लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात अनेक बाबींना शिथिलता दिली असून, कर्नाटक सरकारनं धार्मिक स्थळ खुली करण्यासाठी पंतप्रधानांकडे परवानगी मागितली आहे. केंद्राकडून मंजूरी मिळाल्यास कर्नाटकात १ जूनपासून धार्मिक स्थळ खुली होणार आहेत.

लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपल्यानंतर कर्नाटकात धार्मिळ स्थळे खुली करण्याची तयारी येडियुरप्पा सरकारनं सुरू केली आहे. मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवलं आहे. कर्नाटकातील मंदिर, मशीद, चर्च आणि इतर धार्मिक स्थळ खुली करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती पत्रात करण्यात आली आहे.

Read More चादरीने शौचालयात गळफास, तळोजा कारागृहात कैद्याची आत्महत्या

धार्मिक स्थळं खुली करण्यापूर्वी आम्हाला इतर परवानग्या घ्याव्या लागणार आहे. त्यामुळे काय होतंय बघू. जर केंद्र सरकारकडून परवानगी मिळाली, तर १ जूनपासून धार्मिक स्थळे उघडू शकतील, असं मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी सांगितलं. देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर केंद्र सरकारनं लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर कोरोनाचा प्रसार नियंत्रणात येत नसल्यानं सरकारनं तीन वेळा लॉकडाऊनचा कालावधी वाढवला. सध्या देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू आहे. चौथ्या टप्प्यात केंद्र सरकारनं अनेक सेवा सुरू करण्यास मुभा दिली. विशेषत: विमान वाहतूक सुरू न करण्याचा निर्णय सुरूवातीला घेण्यात आला होता. मात्र, नंतर निर्णय बदल मर्यादित स्वरूपात विमान वाहतुकही सुरू करण्यात आली आहे. चौथा लॉकडाऊन संपायला चार दिवस शिल्लक आहेत. मात्र, अनेक ठिकाणी परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे पाचव्या टप्प्यात लॉकडाऊन वाढवला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारची मागणी मान्य करण्याची शक्यताही कमी आहे.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या