22.2 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रनागपूर मध्यवर्ती कारागृहात कैद्यांचा राडा

नागपूर मध्यवर्ती कारागृहात कैद्यांचा राडा

एकमत ऑनलाईन

नागपूर : नागपूर मध्यवर्ती कारागृह पुन्हा चर्चेत आले आहे. नागपूर कारागृहात राडा झाल्यामुळे कारागृह प्रशासनावर सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. दोन गुंडांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर हाणामारी झाली असल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे जेल प्रशासनाची झोपच उडाली आहे.

विशेष म्हणजे याआधी मोबाईल, बॅटरी आणि गांजाही नागपूर मध्यवर्ती कारागृहात आढळून आला होता. या घटनेला फार दिवस उलटले नाहीत, तोच आता कारागृहात राडा झाल्याने प्रशासनाच्या कारभारावर शंका घेतली जात आहे.

जेलमध्ये शिक्षा भोगत असलेला कुख्यात गुन्हेगार अबू खानला मारहाण करण्यात आली. भुरू नावाच्या एका गुंडासोबत अबू खान याची बाचाबाची झाली. त्यानंतर अबू खान याला मारहाण करण्यात आली. मारहाणीच्या या घटनेने कैद्यांमध्येही दहशत माजली आहे, तर जेल प्रशासनाचा कैद्यांवर कोणताही धाक उरलेला नसल्याचेही अधोरेखित झाले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या