नवी दिल्ली : यंदा हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. निवडणुकांसाठी काँग्रेसदेखील तयारीला लागली आहे. काँग्रेसने प्रियंका गांधी यांच्यावर निवडणुकीची कमान सोपवणार आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने काही महत्वाचे निर्णय देखील घेतले आहेत. काँग्रेसने प्रत्येक जिल्ह्यात राष्ट्रीय सचिव देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या सचिवांपैकी एक तृतीयांश सचिव हे प्रियंका गांधी यांच्या टीमचे असणार आहेत.
बैठकीत उपस्थित असलेल्या सचिवांमध्ये दीपिका पांडे, चंदन यादव, राजेश तिवारी, रोहित चौधरी, धीरज गुर्जर, प्रदीप नरवाल, विकास उपाध्याय, विजय स्ािंगला आणि चेतन चौहान यांचा समावेश होता. या सर्व राष्ट्रीय सचिवांना आठवडाभरात कामाला सुरुवात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राजस्थानमधील च्ािंतन शिबिरानंतर या सचिवांना पक्षाच्या वतीने हे काम देण्यात आले आहे. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि प्रभारी राजीव शुक्ला यांनी काँग्रेस मुख्यालयातील बैठकीला हजेरी लावली, त्यांनी देखील आवश्यक त्या सूचना या बैठकीत दिल्या आहेत.
यूपीतील टीमही प्रियंकासोबत असणार
उत्तर प्रदेशमध्ये प्रियंका गांधींसोबत काम केलेल्या चार नेत्यांना देखील हिमाचल प्रदेशमध्ये जबाबादारी मिळाली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अलीकडेच, काँग्रेस नेतृत्वाने राज्य संघटनेत फेरबदल करुन माजी मुख्यमंत्री दिवंगत वीरभद्र सिंह यांच्या पत्नी प्रतिभा स्ािंह यांना प्रदेशाध्यक्ष केले आहे.
पोटनिवडणुकीप्रमाणे यशाची अपेक्षा
गेल्या वर्षी मंडी लोकसभेसह विधानसभेच्या ३ जागा काँग्रेसने ज्ािंकल्या होत्या. त्यानंतर आता पोटनिवडणुकीतील विजयाची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत करण्याची तयारी व आत्मविश्वास काँग्रेसला वाटत आहे, असे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. काँग्रेस आणि भाजपच्या या लढाईत आम आदमी पार्टीनेही उडी घेतली असून पंजाबमध्ये सत्तासंपादन केल्यानंतर हिमाचलप्रदेशातही विजयाची शक्यता आपला वाटत आहे.