बर्मिंगहम : प्रियंकाने महिलांच्या १०,००० मीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्यपदक पटकावले आहे. त्याने ४३.३८ मिनिटांत आपली शर्यत पूर्ण केली. ऑस्ट्रेलियाच्या जेमिमाने ४२.३४ मिनिटांच्या वेळेसह सुवर्णपदक जिंकले. त्याचवेळी केनियाच्या एमिलीने ४३.५०.८६ मिनिटांत तिसरे स्थान पटकावले.
प्रियंका गोस्वामीने या विजयासह इतिहास रचला आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. प्रियंका गोस्वामीने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्यावेळीस ती १७ व्या स्थानावर राहिली होती. मात्र राष्ट्रकुल स्पर्धेत या खेळाडूने अप्रतिम कामगिरी करत प्रियंकाने इतिहास रचला. प्रियंका गोस्वामीला आधी जिम्नॅस्ट बनायचे होते. पण अॅथलेटिक्समध्ये मिळालेल्या बक्षिसांकडे ती आकर्षित झाली आणि तिने हा खेळ हाती घेतला. २०२१ फेब्रुवारीमध्ये प्रियंकाने विक्रमी वेळेसह २० किमीची शर्यत जिंकली.