25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रदहावी, बारावी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

दहावी, बारावी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

एकमत ऑनलाईन

बारावीची २१ फेब्रुवारीपासून, १० वीची २ मार्चपासून परीक्षा
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणा-या इयत्ता दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक सोमवारी जाहीर करण्यात आले. बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च २०२३ या कालावधीत तर दहावीची लेखी परीक्षा २ मार्च ते २५ मार्च या कालावधीत होणार आहे.

महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावी आणि दहावीच्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जारी करण्यात आले. हे संभाव्य वेळापत्रक बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले. शाळा, कनिष्ठ महाविद्यालय आणि विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या हेतूने फेब्रुवारी-मार्च २०२३ च्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले.

शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर संभाव्य वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असणार आहे. त्या छापील वेळापत्रकानुसार परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेला प्रविष्ट व्हावे. अन्य कोणत्याही संकेतस्थळावर किंवा यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हाट्सअ‍ॅप किंवा इतर माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्रा धरू नये, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले. तसेच प्रात्यक्षिक परीक्षा श्रेणी तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत कळविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेचे तयारी करताना योग्य नियोजन करता यावे, यासाठी संभाव्य वेळापत्रकाच्या तारखा दिवाळीअगोदर बोर्डाने जाहीर केल्या आहेत.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या