25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यात आता प्लास्टिक थर असलेल्या उत्पादनांवर बंदी

राज्यात आता प्लास्टिक थर असलेल्या उत्पादनांवर बंदी

एकमत ऑनलाईन

राज्य सरकारचा निर्णय, सिंगल यूज प्लास्टिकवरही प्रतिबंध
मुंबई : भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगलेच कामाला लागले आहेत. आता प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर बंदी घालण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला. राज्यातील प्लॉस्टिकच्या वापरामुळे निर्माण होणा-या गंभीर समस्या लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्लॉस्टिक बंदी नियमात सुधारणा करण्याचे निर्देश दिले होते.

केंद्र शासनाने १ जुलै २०२२ पासून सिंगल युज प्लॉस्टिकवर बंदी घातली असून राज्यात या बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्र हे सिंगल युज प्लॉस्टिकबंदी करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

राज्यात प्लॉस्टिक बंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एक समिती नेमण्यात आली होती. या समितीने ७ जुलै २०२२ रोजीच्या बैठकीत महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकॉल उत्पादने अधिसूचना २०१८ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार राज्य शासनाने १५ जुलै २०२२ रोजीच्या अधिसूचनेद्वारे प्लास्टिक लेपीत आणि प्लॅस्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर बंदी घातली आहे.

या सुधारणेनंतर राज्यात प्लॉस्टिक थर तसेच प्लॉस्टिकाचा थर असणा-या पेपर किंवा अ‍ॅल्युमिनियम इत्यादी पासून बनवलेले डीस्पोजेबल डीश, कप, प्लेट्स, ग्लासेस, काटा, वाडगा, कंटेनर इत्यादी एकल वापरावर, वापर उत्पादनावर आता बंदी असणार आहे. दैनंदिन कच-यातील प्लास्टिकचा कचरा कमी करणे हा बंदीमागचा मुख्य उद्देश आहे.

सिंगल यूजच्या नावाखाली
प्लास्टिकचा अतिवापर
सध्या राज्यात सिंगल युज प्लॉस्टिकमध्ये कप, प्लेट्स, वाडगा, चमचे, कंटेनर इत्यादींच्या वापरावर बंदी आहे. परंतु बाजारात डीश, कंटेनर, ग्लास, कप इत्यादी पेपरच्या नावाखाली प्लास्टिक लेप असलेले किंवा प्लॉस्टिक लॅमिनेशन केलेल्या वस्तू मोठ्या प्रमाणात वापरल्या जात आहेत. मात्र, विघटनास घातक ठरणा-या अशा निकृष्ट दर्जाच्या प्लॉस्टिकवरही बंदी घातली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या