16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeमहाराष्ट्रप्रकल्प गुजरातला जातात, सरकार बघ्याच्या भूमिकेत; एअरबस प्रकल्पावरून जयंत पाटलांची टीका

प्रकल्प गुजरातला जातात, सरकार बघ्याच्या भूमिकेत; एअरबस प्रकल्पावरून जयंत पाटलांची टीका

एकमत ऑनलाईन

मुंबई : वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पापाठोपाठ आता नागपुरातील टाटा एअरबस प्रकल्प देखील महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने विरोधक सत्ताधा-यांवर टीका करत आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार? अशी विचारणा त्यांनी सत्ताधा-यांना केली आहे.

प्रकल्प गुजरातला जात आहेत मात्र शिंदे-फडणवीस यांनी बघ्याकी भूमिका घेतली आहे. अशी टीकाही जयंत पाटलांनी केली आहे.

ट्विट करत जयंत पाटील म्हणाले की, वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पानंतर नागपूरमध्ये होणारा २२ हजार कोटींचा टाटा एअरबस प्रकल्प आज गुजरातला गेला. एकामागून एक मोठे प्रकल्प गुजरातला जात आहेत. महाराष्ट्रातील सध्याचे सरकार दिल्लीसमोर किती हतबल झाले आहे हे यातून स्पष्ट होते.

महाराष्ट्रातील सत्तांतर राज्याला वेठीस धरण्यासाठी झाले आहे का? असा प्रश्न सध्या पडत आहे. गुजरात निवडणुकांच्या अनुषंगाने सर्व प्रकल्प गुजरातला नेले जात आहेत आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री मात्र बघ्याच्या भूमिकेत आहेत. आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार आहात?

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या