25.2 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeनांदेडमहाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातला पळविले

महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातला पळविले

एकमत ऑनलाईन

राज्यात बेरोजगारी वाढविण्याचे सरकारचे पाप : राहुल गांधी

नायगाव : लक्षमण बरगे
विमान व हेलीकॉप्टरमधून फिरल्याने देशाचे दु:ख ओळखता येत नाही. मी पायी चालत असल्याने मला देशातील शेतकरी, युवक, कष्टक-यांचे दु:ख लक्षात येत आहे. मोदी सरकारच्या चुकांमुळे देशात महागाईबरोबर बेरोजगारी वाढत आहे. महाराष्ट्रात येणारे अनेक उद्योग गुजरातला पळविले आहेत. यातून महाराष्ट्रातील बेरोजगारी वाढविण्याचे पाप भाजप सरकारने केले आहे, अशी टीका कॉगे्रस नेते राहुल गांधी यांनी कुष्णूर येथील सभेत केली.

बुधवारी सकाळी शंकरनगर येथून सकाळी ६ वाजता निघालेली भारत जोडो यात्रा साडेदहा वाजता नायगाव येथे पोहोचली. विश्रांतीनंतर दुपारी ४ वाजता निघालेली भारत जोडो यात्रा देगाव, घुंगराळा करत कुष्णूर येथे पोहोचली. त्यावेळी झालेल्या सभेत राहुल गांधी बोलत होते. यावेळी जेष्ठ नेते जयराम रमेश, के. एच. पटेल, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, रजनीताई पाटील, आ. अमर राजूरकर, माजी आ. वसंतराव चव्हाण, हनमंतराव पा. बेटमोगरेकर, जिल्हाध्यक्ष गोविदंराव नागेलीकर, माजी सभापती संजय बेळगे, मिनल खतगावकरआदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, मोदीजींनी नोटाबंदी करत काळे धन बाहेर काढणार असल्याचे सांगितले. पण काळे धन कुठे गेले, हे देशातील जनतेला अद्याप कळाले नाही. आम्ही सत्तेवर असताना गॅस, पेट्रोल डिझेल व जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर होते. आज याच वस्तूंचे भाव किती वाढले आहेत, याकडे भाजप सरकार लक्ष द्यायला तयार नाही. लोकसभेत विरोधी पक्षाचे खासदार यावर बोलत आहेत. पण याकडे भाजप सरकार दुर्लक्ष करीत आहे, ही शोकांतिका आहे, असे राहुल गांधी म्हणाले. धक्कादायक बाब म्हणजे गुजरातमध्ये निवडणुका आल्याने ब-याच कंपन्या गुजरातमध्ये पळविल्या. परंतु याबाबत मीडिया आवाज उठवायला तयार नाही. भाजप सोडून विरोधी पक्षाच्या चांगल्या गोष्टी टीव्हीवर दाखवत नाहीत, याला काय म्हणावे मला कळेनासे झाले आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.

भारत जोडण्यासाठी ही यात्रा सुरू आहे. या देशात जातीवादी मदभेद निर्माण करण्याचे काम करण्यात येत आहे. देश तोडणा-यांपासून सर्वानी सावधान झाले पाहिजे. देशात महाराष्ट्रात व्यक्तीगत लढाई सुरू आहे, असे म्हणत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण म्हणाले की, गेल्या तीन दिवसांपासून राहुल गांधी यांची नांदेड जिल्ह्यात नफरत छोडो भारत जोडो यात्रा सुरू आहे. यात्रेत हजारो लोक सामिल होऊन राहुल गांधी सोबत चालत आहेत. या गर्दीला पोलिस दल चांगली सुरक्षा पुरवित आहेत. माध्यम प्रतिनिधींचे हे सहकार्य मिळत आहे.

चालण्यामुळे प्रश्न
जाणून घेता आले
मी पायी चालताना अनेकांचे म्हणणे ऐकून घेतले. यात शेतकरी, युवक,उच्च शिक्षित, छोटे व्यापारी हैराण असल्याचे दिसून येत आहे. मला या यात्रेतून बरेच काही शिकायला मिळाले. भारतातील लोकांच्या अडीअडचणी कळत आहेत, त्या जाणून घ्यायच्या असतील, तर विमानातून नाही तर पायी चालावे लागते हे मला कळाले.

मोदींचा छोटे व्यापारी
संपविण्याचा डाव
जीएसटीमुळे देशात त्सुनामी आली, या त्सुनामीत छोटे व्यापारी संपले. मोदीजींना छोटे व्यापारी संपवून सर्व व्यापार त्यांच्या तीन-चार मोठ्या उद्योगपतीच्या हातात द्यायचा आहे, असे सध्या तरी दिसून येत आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या