पुणे : पुण्यातील भाजप पदाधिका-याने अजित पवार यांच्यामुळे आपल्या जिवाला धोका असल्याची तक्रार दिली आहे.
यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले की, माझ्याविरोधात ज्याने तक्रार दिली आहे त्याला संरक्षण मिळाले पाहिजे. माझ्यामुळे कुणाच्या जिवाला धोका आहे असे वाटते का? मी कायदा आणि संविधान पाळणारा माणूस आहे.
अजित पवार म्हणाले की, कोणाच्याही जिवाला धोका असेल त्याला संरक्षण मिळायला हवे. ज्याने तक्रार केलीय त्याला संरक्षण द्यावे. तुम्हाला वाटतं का माझ्यामुळे कुणाच्या जिवाला धोका आहे? मी कायदा आणि संविधान पाळणारा माणूस आहे. माझ्यामुळे धोका कसा असेल? असा प्रतिप्रश्न अजित पवार यांनी केला.