27 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रशिंदे गटातील आमदारांच्या कुटुंबीयांना आजच संरक्षण द्या : राज्यपाल कोश्यारी

शिंदे गटातील आमदारांच्या कुटुंबीयांना आजच संरक्षण द्या : राज्यपाल कोश्यारी

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आमदारांसोबत बंड पुकारल्यामुळे सध्या महाराष्ट्रातील वातावरण तापलं आहे. या पार्श्वभूमीवर आमदारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्याचा निर्णय केंद्राने दिला आहे.

दरम्यान, आता केंद्रापाठोपाठ राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईचे डीजीपी आणि पोलिस आयुक्तांना पत्र लिहलं आहे. शिंदे गटातील आमदारांना आजच सुरक्षा द्या अशा आशयाचे हे पत्र आहे.

शिंदे गटातील आमदारांना आजच सुरक्षा द्या, असे एक पत्र राज्यपाल कोश्यारी यांनी गृह खात्याला लिहले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. डिस्चार्ज मिळताच राज्यपालांनी घरी येताच तातडीने हा निर्णय घेतला आहे. या पत्राची एक कॉपी मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे आणि महाराष्ट्राचे डीजीपी यांना पाठवण्यात आले आहे. गुवाहाटी येथे असणाऱ्या सर्व आमदारांना सुरक्षतितेची आवश्यकता आहे. त्यामुळे त्यांना सुरक्षा देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, काही वेळापूर्वी शिंदे गटातील पंधरा आमदारांच्या घरी केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरवण्यात येणार असल्याची माहिती मिळली होती. आमदार सदा सरवणकर यांच्या घराबाहेर सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या पूर्ण घराला बॅरिकेट्स लावण्यात आलं आहे. बंडखोर आमदारांविरोधात मुंबई, पुण्यासह राज्यभरात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांच्या सुरक्षेवर अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे केंद्राने त्यांना संरक्षण पुरवले होते. आता राज्यपालांनीही एक पत्र मुंबई पोलिसांना लिहले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या