Saturday, September 23, 2023

पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये चीनविरोधात निदर्शन, लोकांनी रस्त्यावर उतरुन दिल्या घोषणा

मुझफ्फराबाद-पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबाद शहरात चीन आणि पाकिस्तानविरोधात निदर्शनं करण्यात आली आहेत. निलम आणि झेलम नदीवर बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या धरणांच्या बांधकामाविरोधात हे निदर्शन करण्यात आलं. सोमवारी मोठ्या प्रमाणात लोकांनी रस्त्यावर उतरुन रॅली काढत निलम झेलम आणि कोहला हायड्रो पॉवर प्रोजेक्ट बांधकामाचा निषेध केला.

आंदोलनादरम्यान पाकिस्तान आणी चीनकडून सुरु असलेल्या या बांधकामामुळे निसर्गावर होणाऱ्या परिणामांकडे लक्ष वेधण्यात आलं. जागतिक पातळीवर हा मुद्दा अधोरेखित करण्यासाठी ट्विटरवर #रं५ीफ्र५ी१२रं५ीअखङ हे कॅम्पेनही ट्रेंड करण्यात आलं. कोणत्या कायद्याखाली पाकिस्तान आणि चीनकडून या वादग्रस्त जमिनीवर बांधकाम केलं जात आहे अशी विचारणा आंदोलकांकडून करण्यात आली आहे.

पाकिस्तान आणि चीनकडून या नदींचा ताबा घेत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या नियमांचं उल्लंघन केलं जात असल्याचा आरोप आहे. चिनी कंपनी आणि पाकिस्तान आणि चीनच्या सरकारदरम्यान कोहला येथे ११२५ मेगावॅट हायड्रो पावर प्रोजेक्ट उभारण्यासाठी करार झाला आहे. यासाठी २.४ बिलियन डॉलर इतका खर्च येणार आहे.

Read More  नैराश्यामुळे टिकटॉक स्टारची आत्महत्या

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या