22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeमहाराष्ट्रबंडखोरांच्या कुटुंबियांना केंद्राची सुरक्षा द्या

बंडखोरांच्या कुटुंबियांना केंद्राची सुरक्षा द्या

एकमत ऑनलाईन

अमरावती : राजकीय आकसापोटी शिवसेनेतील एकनाथ शिंदे समर्थक आमदारांची सुरक्षाव्यवस्था काढली, असा आरोप शिंदे गटाने केला आहे. यावरून संजय राऊतांनी आमदारांच्या सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकारची आहे. कुटुंबियांची नाही, असे वक्तव्य केले आहे. त्यात खासदार नवनीत राणा यांनी उडी घेतली. बंडखोरांच्या कुटुंबियांना केंद्राची सुरक्षा द्या, अशी मागणी नवनीत राणा यांनी केली. याशिवाय ठाकरेंना उद्देशून त्यांनी काही विधान केले आहे.

शिंदे गट हीच खरी सेना
नवनीत राणा म्हणाल्या, एकनाथ शिंदे गट खरी शिवसेना आहे. बाळासाहेबांसोबत काम करणारे खरे शिवसैनिक आहेत. हिंदुत्वासाठी त्यांनी कित्येक वर्षांपासून काम केले. उद्धव ठाकरे यांच्यापासून आता ते दूर गेले आहेत.

परंतु, त्यांना बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेवायचे आहेत. एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले की, आम्ही उद्धव ठाकरे यांचे सैनिक नाहीत. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे सैनिक आहोत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या