26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रगोगलगायींनी हैराण झालेल्या शेतक-यांना आर्थिक मदत द्या

गोगलगायींनी हैराण झालेल्या शेतक-यांना आर्थिक मदत द्या

एकमत ऑनलाईन

मुंबई : बीड, लातूर व उस्मानाबाद यासह काही जिल्ह्यातील सोयाबीन पिकांचे गोगलगायींनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले, तीन-चार वेळा पेरणी केलेल्या शेतक-यांना पीकही हाती लागले नाही
अशा शेतक-यांनाकपाशीवर पडलेल्या बोंडअळीवर ज्याप्रमाणे विशेष मदत देण्यात आली.

त्याप्रमाणे गोगलगायींनी नुकसान केलेल्या शेतक-यांना सरकारने आर्थिक मदत करण्याची मागणी मुंडे यांनी केली आहे. शेतक-यांचे झालेल्या नुकसानीची दाहकता व प्रमाण पाहता राज्यसरकारने अतिवृष्टी बाधित शेतक-यांना नुकत्याच जाहीर केलेल्या एनडीआरएफच्या निकषांप्रमाणे मदतीच्या तिप्पट मदत देण्यात यावी, अशी मागणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधानसभेत लक्षवेधी मांडून केली.

विधानसभेचं कामकाज सुरू झाल्यावर एका लक्ष्यवेधीवर बोलताना धनंजय मुंडे यांनी ही मागणी केली.
या लक्षवेधीवर राज्यसरकारच्यावतीने कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी उत्तर दिलं. सदर नुकसानीची माहिती राज्य शासनास पूर्णपणे प्राप्त व्हावी यासाठी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ शास्त्रज्ञ व अभ्यासक अशा ५ अधिका-यांची समिती नेमून गोगलगायींनी केलेल्या नुकसानीचा अभ्यास व पडताळणी करून अहवाल मागवला जाईल.

या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित शेतक-यांना मदत देण्याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल, असं आश्वासन अब्दुल सत्तार यांनी दिलं. त्यावर धनंजय मुंडे यांनी आपला मुद्दा मांडला.

कृषी मंत्र्यांचे आश्वासन
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात सुमारे ४ हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रात गोगलगायींनी उगवलेले सोयाबीन खाऊन टाकले. शेतक-यांना आर्थिक मदत मिळण्याबाबत धनंजय मुंडे यांनी आज विधानसभेत शेतक-यांचा विषय लक्षवेधीद्वारे मांडल्यानंतर कृषी मंत्र्यांनी या विषयाची गांभीर्याने दखल घेत, अभ्यास समिती नेमून आर्थिक मदतीचे आश्वासन दिले आहे.

राष्ट्रवादीच्या कार्यालयाचे उद्घाटन
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील व विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते आज विधीमंडळातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अजित पवार तसेच इतर मान्यवरांनी संपूर्ण कार्यालयाची पाहणी केली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या