25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeमहाराष्ट्रसंजय राठोड प्रकरणात पुणे पोलिसांचा तपास संशयास्पद ?

संजय राठोड प्रकरणात पुणे पोलिसांचा तपास संशयास्पद ?

एकमत ऑनलाईन

पुणे : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये शिंदे गटातील नेते संजय राठोड यांना मंत्रिपद देण्यात आले. त्यांच्या या मंत्रिपदावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. मविआमध्ये असताना एका तरुणीच्या मृत्यूप्रकरणात सहभागी असल्याचे आरोप भाजपतर्फे करण्यात आल्याने त्यांना मंत्रिपद गमवावे लागले होते. तरुणीच्या मृत्यूप्रकरणाचा संजय राठोड यांना क्लीन चिट देणारा रिपोर्ट समोर आला आहे. त्यात या प्रकरणात पोलिसांचा तपास संशयास्पद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
रिपोर्टमध्ये काय आहे?

तरुणीच्या मृत्यूप्रकरणी संजय राठोड यांना क्लीन चिट देणारा रिपोर्ट समोर आला आहे. त्यात अनेक बाबी स्पष्ट होत आहेत. पुण्यातील वानवडी भागात २१ वर्षीय तरुणीचा ८ फेब्रुवारी २०२१ ला संशयास्पद मृत्यू झाला होता. या प्रकरणी सुरुवातीला आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली. मात्र वर्षभराच्या तपासानंतर पुणे पोलिसांनी एप्रिल २०२२ मध्ये या तरुणीचा मृत्यू हा आत्महत्या किंवा घातपात असल्याचे म्हणत वर्षभराच्या तपासानंतर पुणे पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दाखल केला.

मात्र त्या तरुणीला हे टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ का आली? याचा पोलिसांच्या या रिपोर्टमध्ये कुठेही उल्लेख नाही. संबंधित तरुणीसोबतच्या ऑडिओ रेकॉर्डिंग्ज या आपल्याच असल्याचे आणि ती आपल्याशी परिचित असल्याचे संजय राठोड यांनी मान्य करून देखील पोलिसांनी संजय राठोड या तरुणीच्या मृत्यूला कारणीभूत आहेत का? याचा तपास केला नाही. त्यामुळे हा तपास अपूर्ण ठरला आहे.

त्या प्रकरणात संजय राठोड यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. पोलिसांनी संबंधित तरुणीच्या मृत्यूचा तपास केला. पुणे पोलिसांनी या मृत्यूचे कारण अपघात किंवा आत्महत्या असे दिले होते. आत्महत्या असेल तर आत्महत्येचे कारण पुणे पोलिसांनी शोधण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे हा तपास संशयास्पद ठरला आहे. नव्या सरकारमध्ये संजय राठोड यांना मंत्रिपद देण्यात आले. त्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या मंत्रिपदावर आक्षेप घेतला. संजय राठोड यांना मंत्रिपद दिले जाणे दुर्दैवी असल्याचे चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या