24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeराष्ट्रीयपुण्याच्या नेहा नारखेडेचा फोर्ब्सच्या यादीत डंका

पुण्याच्या नेहा नारखेडेचा फोर्ब्सच्या यादीत डंका

एकमत ऑनलाईन

पुणे : पुण्यात जन्मलेल्या नेहा नारखेडेने वयाच्या अवघ्या ३७ व्या वर्षी खुप मोठ यश संपादित केले आहे आणि हे सामान्य नाही. तीने आयआयएफएल वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२२ मध्ये स्थान मिळवले आहे. श्रीमंतांच्या या यादीत ती सर्वात तरुण सेल्फ मेड वुमन उद्योजिका आहे. नेहाने सुरुवातीचे शिक्षण पुण्यातच केले. मात्र, नंतर ती संगणकशास्त्र शिकण्यासाठी अमेरिकेत गेली.

नेहाने जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेतले आहे. ती कॉन-फ्ल्यूएंट या कंपनीची संस्थापक आहे. याशिवाय, अपाचे काफ्का ही ओपन सोर्स मेसेसिंग सिस्टीम विकसित करण्यात तिचा मोठा वाटा आहे. सध्या ती अनेक तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये सल्लागार आणि गुंतवणूकदार म्हणून काम करत आहे. नेहा नारखेडे हारुन इंडिया रिच लिस्टमध्ये ३३६ व्या क्रमाकावर आहे. तिची अंदाजे संपत्ती ४७०० कोटी रुपये आहे. फोर्ब्सच्या श्रीमंत महिलांच्या यादीत नेहाने ५७ वा क्रमांक मिळवला आहे. २०१८ मध्ये, नेहा नारखेडेचे नाव फोर्ब्सने टेक संबंधित महिलांच्या यादीत समाविष्ट केले होते. हुरुन इंडियाच्या मते, १००० कोटींपेक्षा जास्त संपत्ती असलेल्या एकूण ११०३ लोकांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा यादीत ९६ लोकांची वाढ झाली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या