भारतीय कुस्तीपटूंचा ट्रिपल धमाका, बजरंग, दीपकसह साक्षीची कमाल
बर्मिंगहॅम : भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाने बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दिमाखदार कामगिरी केली. त्याने ६५ किलो वजनी गटात कॅनडाच्या लॅचलॅन मॅक्नेलीला ९-२ अशा मोठ्या फरकाने पराभूत करून भारताला कुस्तीमधील पहिले तर एकूण सहावे सुवर्णपदक मिळवून दिले. यासोबतच महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने दिमाखदार खेळ करत भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळवून दिले. त्यानंतर सर्वांच्या नजरा दीपक पुनिया याच्या कामगिरीकडे लागले होते. त्यानेही शानदार कामगिरी करीत पाकिस्तानच्या कुस्तीपटूला नमवून आज कुस्तीतील तिसरे सुवर्ण पदक पटकावले, अंशू मलिकने महिलांच्या ५७ किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई केली.
भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनियाने राष्ट्रकुल स्पर्धेत धडाकेबाज कामगिरी केली. त्याने या स्पर्धेत भारताला कुस्तीमधील पहिले तसेच एकूण सहावे सुवर्णपदक मिळवून दिले. त्याने ६५ किलो वजनी गटात ही नेत्रदीपक कामगिरी केली असून कॅनडाचा प्रतिस्पर्धी लॅचलॅन मॅक्नेली याला ९-२ अशा मोठ्या फरकाने पराभूत केले. आधीही बजंरग पुनियाने २०१८ सालच्या राष्ट्रकुल स्पर्धेत चांगला खेळ कर सुवर्णपदक जिंकले होते, तर २०१४ सालच्या कॉमनवेल्थ गेममध्ये त्याने रौप्यपदकाची कमाई केली होती.
बजरंग पुनियासोबतच महिला कुस्तीपटू साक्षी मलिकनेदेखील दिमाखदार खेळ करत भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळवून दिले. तिने ६२ किलो गटात ही कामगिरी करुन दाखवली. ती ०-४ अशा गुणांनी पिछाडीवर होती. मात्र सामना अंतिम टप्प्यात असताना तिने दिमाखदार चाली खेळत प्रतिस्पर्ध्याला गारद केले. सुरुवातीला ०-४ अशा पिछाडीवर असूनही तिने सुवर्णपदकापर्यंत मजल मारली. त्यानंतर सर्वांच्या नजरा दीपक पुनियाच्या कामगिरीकडे होते. त्यानेही ८६ किलो वजन गटात पाकिस्तानच्या मुहमद इनाम याला ३-० ने पराभूत केले. त्याच्या विजयाने एकाच दिवशी भारताने कुस्तीत ३ सुवर्णपदक पटकावून हॅट्ट्रिक केली.
अंशू मलिकने जिंकले रौप्य पदक
बजरंग पुनियाच्या अगोदर अंशू मलिकने महिला कुस्तीमील ५७ किलो गटात रौप्य पदकाची कमाई केली. अंतिम सामन्यात नायजेरियाच्या ओडुनायोने तिला पराभूत केले. नायजेरिच्या पहिल्या फेरीत चार गुण मिळवले. तसेच दुस-या फेरतीही दोन गुण मिळवले, तर अंशूने दुस-य फेरीत चार गुण मिळवून बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला. मात्र यात ती अयशस्वी झाली. परिणामी तिला रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले.