36.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeक्रीडापंजाब किंग्जचा बंगळुरूला दणका

पंजाब किंग्जचा बंगळुरूला दणका

एकमत ऑनलाईन

मुंबई : आयपीएलच्या ६० व्या लढतीत पंजाब किंग्जने बंगळुरु संघावर ५४ धावांनी दणदणीत विजय मिळवला. पंजाबने विजयासाठी दिलेले २१० धावांचे लक्ष्य गाठताना बंगळुरु संघाची दमछाक झाली. २० षटकांपर्यंत बंगळुरु संघ १५५ धावा करू शकला. पंजाबच्या लियाम लिव्हिगस्टोन आणि जॉनी बेअरस्टो या फलंदाजांनी धडाकेबाज खेळी केल्यामुळेच पंजाबला विजयापर्यंत पोहोचता आले. या विजयानंतर प्लेऑफर्यंत पोहोचण्यासाठी पंजाबला पुढचे दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत.

पंजाबने दिलेल्या २१० धावांचे लक्ष्य गाठताना बंगळुरु संघाची दमछाक झाली. सलामीला आलेली फॅफ डू प्लेसिस (१०) आणि विराट कोहली (२०) ही जोडी खास कामगिरी करु शकली नाही. सलामीचे हे दोन्ही फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाज चांगली खेळी करतील, अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनीदेखील निराशा केली. रजत पाटीदारने २६ धावा केल्या. तो राहुल चहरच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्यानंतर महिपाल लॉमरोर (६) स्वस्तात बाद झाला.

चौथ्या विकेटसाठी आलेल्या ग्लेन मॅक्सवेलने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र ३५ धावांवर असताना तो हरप्रित ब्रारच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्यानंतर बंगळुरुचा फिनिशर म्हणून ओळख असलेल्या दिनेश कार्तिकचाही आज निभाव लागला नाही. त्याने अवघ्या ११ धावा केल्या. त्यानंतर शेवटच्या फळीतील फलंदाजही निराशाजनक कामगिरी करत तंबुत परतले. परिणामी वीस षटके संपेपर्यंत बंगळुरु संघ ९ गडी बाद १५५ धावा करु शकला. परिणामी पंजाब किंग्ज संघाचा ५४ धावांनी विजय झाला.

यापूर्वी बंगळुरु संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे पंजाब किंग्जने फलंदाजीसाठी उतरत सुरुवातीपासूनच धडाकेबाज खेळी केली. सलामीला आलेल्या जॉनी बेअरस्टोने २९ चेंडूंमध्ये सात षटकार आणि चार चौकार लगावत ६६ धावा केल्या. तर शिखर धनवने २१ धावा करत बेअरस्टोला साथ दिली. या जोडीने ६० धावांची भागिरादी केली. दुस-या विकेटासाठी आलेल्या भानुका राजपक्षेने (१) मात्र निराशा केली.

तिस-या विकेटसाठी आलेल्या लियाम लिव्हिंगस्टोने तुफान फटकेबाजी करत ४२ चेंडूंमध्ये ७० धावा केल्या. परिणामी पंजाब संघाने मोठी धावसंख्या उभारली. लिव्हिंगस्टोन बाद झाल्यानंतर पंजाबचे शेवटच्या फळीतील फलंदाज खास कामगिरी करु शकले नाहीत. शेवटच्या फळीतील जितेश शर्माने ९ तर हरप्रित बाबर आणि ऋषी धवनने सात धावा केल्या. राहुल चहर (नाबाद) फक्त दोन धावा करुन शकला.

दरम्यान, गोलंदाजी विभागात आज पंजाब संघ सरस ठरला. पहिल्या पावर प्लेपासूनच पंजाबने बंगळुरु संघाला हादरवून टाकले. ४० धावा होईपर्यंत बंगळुरुचे तीन फलंदाज बाद झाले होते. कसिगो रबाडाने विराट कोहली, शाहबाज अहमद आणि हर्षल पटेल या दिग्गज फलंदाजांचा बळी घेतला.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या