25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeक्रीडाअखेरच्या सामन्यात पंजाब विजयी

अखेरच्या सामन्यात पंजाब विजयी

एकमत ऑनलाईन

मुंबई : पंजाब किंग्जने सनराईजर्स हैदराबादचे १५८ धावांचे आव्हान १५.१ षटकांत पाच गडी राखून पार करत यंदाच्या आयपीएल हंगामातील आपला शेवटचा सामना जिंकून शेवट गोड केला. पंजाबकडून लिम लिव्हिंगस्टोनने २२ चेंडूत नाबाद ४९ धावा केल्या. तर शिखर धवनने ३९ धावांचे योगदान दिले. हैदराबादकडून फझलहक फारूकीने २ विकेट घेतल्या. तत्पूर्वी हैदराबादकडून अभिषेक शर्माने ४३ तर वॉशिंग्टन सुंदरने २५ आणि रोमरियो शेफर्डने नाबाद २६ धावा केल्या. पंजाबकडून नॅथन एलिस आणि हरप्रीत ब्रार यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या.

सनराईजर्स हैदराबादचे १५८ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या हैदराबादची सुरूवात खराब झाली. सलामीवीर जॉनी बेअरस्टो फझलहक फारूकीच्या गोलंदाजीवर २३ धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या आक्रमक फलंदाज शाहरूख खानने पुन्हा एकदा निराशा केली. त्याला १९ धावांवर उमरान मलिकने बाद केले.
एका बाजूने शिखर धवनने डाव सावरला होता. मात्र हैदराबादचा कर्णधार मयांक अग्रवाल वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर सुचितकडे झेल देऊन अवघ्या १ धावेची भर घालून परतला. यानंतर शिखन धवन आणि लिम लिंिव्हगस्टोनने पंजाबला शतकी मजल मारून दिली. ही जोडी जमली असे वाटत असतानाचा फारूकीने शिखर धवनचा ३९ धावांवर त्रिफळा उडविला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या