27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeकँटीनमधील स्वदेशीसाठी खरेदी स्थगित

कँटीनमधील स्वदेशीसाठी खरेदी स्थगित

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: वृत्तसंस्था
केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या जवानांसाठी असलेल्या कँटीन सुविधेमध्ये यापुढे स्वदेशी उत्पादनेच उपलब्ध करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर येथील नवी आवश्यक खरेदी तूर्त थांबवण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून याबाबत स्पष्टता आलेली नसल्याने आवश्यक सामानाची खरेदी स्थगित करण्यात आली आहे.

Read More  स्वावलंबन हेच ध्येय हवे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर कलेल्या आत्मनिर्भर संकल्पनेच्या पार्श्वभूमीवर १३ मे रोजी केंद्रीय गृहमंत्रालयाने या कँटीनमधून स्वदेशी वस्तूंचीच विक्री होईल, असे जाहीर केले होते. एक जूनपासून हा आदेश लागू होणार आहे. त्यामुळेच जवानांसाठी सुविधा असलेल्या या कँटीनच्या गरजेनुसार होणारी वस्तूखरेदी तूर्त स्थगित ठेवण्यात आली आहे. गृहमंत्रालयाकडून याबाबत स्पष्टता आल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात आला आहे. तर यापूर्वीच नोंदवलेली मागणी स्वीकारली जाणार असल्याचे केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाने स्पष्ट केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या