24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeबटन दाबताच पाण्यातून ऑक्सिजनची निर्मिती

बटन दाबताच पाण्यातून ऑक्सिजनची निर्मिती

एकमत ऑनलाईन

कोलकाता : पश्चिम बंगालमधील सोलेअर इनिशिएटिव्हज या स्टार्टअप कंपनीने असे उपकरण बनवले आहे की, त्याचे एक बटन दाबताच पाण्यातून ऑक्सिजन वायूची निर्मिती होते. हे उपकरण वेबेल-बीसीसीआय टेन इन्क्यूूबिनेशन सेंटर येथे बसविण्यात आले आहे. ‘ओम रेडॉक्स’ असे नाव आहे.

सोलेअर इनिशिएटिव्हज या स्टार्टअप कंपनीचे सहसंस्थापक डॉ. सौम्यजित रॉय व त्यांच्या पत्नी डॉ. पेई लियांग यांनी दावा केला की, ओम रेडॉक्स उपकरण दुसरे-तिसरे काही नसून, ऑक्सिजन निर्माण करणारा एक सखोल शास्त्रीय शोध आहे. एखाद्या अन्य यंत्राद्वारे मिळणा-या ऑक्सिजनपेक्षा आमच्या उपकरणाद्वारे मिळणारा ऑक्सिजन साडेतीन पट शुद्ध आहे.

डॉ. सौम्यजित रॉय हे कोलकाता येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च या संस्थेत प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी सांगितले की, या उपकरणात पाण्यातून ऑक्सिजनच्या निर्मितीसाठी प्रेशर स्विंग पद्धत वापरली जाते. या तंत्रज्ञानाचे पेटंट घेण्यात आले आहे.

या उपकरणाला जागतिक आरोग्य संघटना, युरोपीय समुदायाने मान्यता दिली आहे. पाण्यातून ऑक्सिजनची निर्मिती करणा-या या नव्या उपकरणाचे जगभरात उत्पादन व्हावे, असा स्टार्टअप कंपनीचा प्रयत्न आहे.

साडेतीन तासाचा बॅटरी बॅकअप
ओम रेडॉक्स उपकरण पांढ-या रंगाच्या पेटीसारखे असून, त्याचे वजन ८ किलो आहे. त्याचे बटन दाबताच उपकरणातील पाण्यातून ऑक्सिजनची निर्मिती होते. हे उपकरण विजेवर चालते. बॅटरीचा बॅकअप साडेतीन तासांचा आहे.

आकार लहान करण्याचा प्रयत्न
पाण्यातून ऑक्सिजन निर्मिती करणा-या ओम रेडॉक्स उपकरणाचा आकार आणखी कमी करणे शक्य आहे. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे सोलेअर इनिशिएटिव्हज या स्टार्टअप कंपनीने सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या