मुंबई : काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा’ या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं. हे वेड अजूनही कमी झालेलं नाही. प्रेक्षक अजूनही ‘पुष्पा’ चित्रपटाची गाणी आणि संवाद यामध्ये अडकून आहेत.
या जबरदस्त चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही धुमाकूळ घातला. या चित्रपटाचा दुसरा भाग कधी येणार याबाबत प्रेक्षक भलतेच उत्सुक आहेत. विशेष म्हणजे ‘पुष्पा २’ या चित्रपटात ‘श्रीवल्ली’या पात्राचा मृत्यू होणार असल्याची जोरदार चर्चा चाहत्यांमध्ये आहे.
ही भूमिका रश्मिका मंदानाने केली होती. त्यामुळे तिचे चाहते या बातमीने नाराज झाले होते. अखेर चित्रपटाचे निर्माते वाय. रवी शंकर यांनीच याबाबत मोठा खुलासा केला आहे.