27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Home'भाजपचे झेंडे, स्टीकर लावा, पण बस चालू द्या': प्रियंका गांधी

‘भाजपचे झेंडे, स्टीकर लावा, पण बस चालू द्या’: प्रियंका गांधी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वढेरा यांनी पुन्हा एकदा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारकडे बसेसना परवानगी देण्याची मागणी केलीय. त्यांनी म्हटलं की, बॉर्डरवर उभ्या असलेल्या या बसेसना २४ तास उलटून गेले आहेत. जर आपल्याला बसेसचा वापर करायचा असेल तर करा, पण आम्हाला परवानगी द्या. जर भाजपला आपले झेंडे आणि स्टीकर बसेसवर लावयचे असतील, तर अवश्य लावा. जर या बसेस आपण उपलब्ध करून दिल्या आहेत, हे दाखवायचं असेल तर करा, मात्र या बसेसना राज्यात येऊ द्या. आतापर्यंत ९२ हजार लोकं घरी पोहोचले असते.

प्रियंका गांधी म्हणाल्या की, आपल्याला सर्वांना आपली जबाबदारी समजावी लागेल. हे भारताचे असे लोकं आहेत, जे भारताचा कणा आहेत. ज्यांच्या मेहनतीवर हा देश चालतो. आपला राजकीय स्वार्थ दूर ठेवून सर्वांना सकारात्मक भावानं मदतीसाठी एकत्र यायला हवंय.

Read More  भाजीविक्रीला जाताना अपघातात ६ शेतकरी ठार

प्रियंकानं सांगितलं, ‘दिल्लीत उभ्या असलेल्या आमच्या बसेसचा हेतू दिल्ली, एनसीआर, नोएडा, गाझियाबादहून पायी जात असलेल्या मजुरांना घरी पोहोचवणं होतं. अशात दिल्ली ते लखनऊ या बसेसना रिकाम्या चालवणं आमचा हेतू संपवण्यासारखं होतं. आम्ही बसेसना गाझियाबाद-नोएडामध्ये तयार राहण्याचा सल्ला दिला आणि परमिट देण्यास सांगितलं. मग इथूनच राजकारण सुरू झालं. लिस्टमध्ये चुकीच्या नंबर्सबाबत बोललं गेलं. आम्ही त्यांना नवीन लिस्ट देण्याच्या तयारीत होतो. मात्र मी या राजकारणात पडण्यापेक्षा म्हणेल की, १७ मे ला आम्ही ५०० बसेस गाझियाबाद बॉर्डरवर उभ्या केल्या होत्या. जर त्या बसेसना परवानगी मिळाली असती तर आतापर्यंत २० हजार लोकं घरी पोहोचले असते.’

प्रियंका गांधी पुढे म्हणाल्या, लॉकडाऊनच्या घोषणेनंतर काँग्रेसनं उत्तरप्रदेशच्या प्रत्येक जिल्ह्यात स्वयंसेवकांचा एक गट बनवला आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत मदत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. या स्वयंसेवकांनी आतापर्यंत जवळपास ६७ लाख लोकांची मदत केलीय. प्रियंका यांनी पुढे सांगितलं, ‘आमची भावना सकारात्मक राहिली आहे आणि आमचा नेहमीच सेवा भाव राहिलाय. काही काळापासून आम्ही सांगत होतो की, यूपी रोडवेजच्या बसेस प्रवासी मजुरांसाठी उपलब्ध करून द्याव्यात. जेव्हा अनेक दुर्घटना झाल्या आणि आम्ही पाहिलं की, यूपी रोडवेजच्या बसेस चालवल्या गेल्या नाहीत, तेव्हा आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून १ हजार बसेस चालविणार असल्याचं सांगितलं.’

मिळालेल्या माहितीनुसार, या १ हजार बसेस वरून काही दिवसांपासून काँग्रेस आणि उत्तर प्रदेश सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दोघांकडून एकमेकांना अनेक पत्र लिहिली गेली आहेत. उत्तर प्रदेश सरकारचं म्हणणं आहे की, काँग्रेसनं १००० हून अधिक बसेसची जी माहिती दिलीय, त्यात काही दुचाकी वाहन, रुग्णवाहिका आणि कारचे सुद्धा नंबर्स आहेत. यावर काँग्रेसचं म्हणणं आहे की, त्यांनी दिलेल्या यादीमध्ये स्वत: उत्तर प्रदेश सरकारनं ८७९ बसेस योग्य असल्याचं म्हटलंय आणि म्हणून आता त्या बसेस चालविण्याची परवानगी देण्यात यावी.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या