24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeगुजरातमध्ये राष्ट्रपती राजवट लावा, ठाकरे सरकार मजबूत-खासदार संजय राऊत

गुजरातमध्ये राष्ट्रपती राजवट लावा, ठाकरे सरकार मजबूत-खासदार संजय राऊत

एकमत ऑनलाईन

मुंबई : ‘महाराष्ट्रातील ठाकरे सरकार मजबूत आहे. शरद पवार हे स्वत: सरकारच्या कामगिरीवर संतुष्ट आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीच्या सरकारला पुढील पाच वर्षात अजिबात धोका नाही. महाविकास आघाडी सरकार पुढील निवडणूकही एकत्र लढेल, असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर ते मातोश्रीवर दाखल झाले होते. त्यावरुन राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरु होत्या. त्याबाबत संजय राऊत यांनी रोखठोक भूमिका मांडली.

शरद पवार मातोश्रीवर आले यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं नाही, पंतप्रधान मोदीसुद्धा पवार साहेबांचं मार्गदर्शन घेतात, महाराष्ट्रात कोरोनाचं संकट आहे, महाराष्ट्रात सरकार बनवण्यात त्यांचं योगदान. कोरोनाचा काळ वेदनेचा, लोक घरी आहेत, विरोधकांना काही सुचतंय, पण एक लक्षात ठेवा महाराष्ट्रातील ठाकरे सरकार हे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना असं महाविकास आघाडीचं आहे, हे पाच वर्ष कार्यकाळ पूर्ण करेल, असं संजय राऊत यांनी ठणकावलं.
शरद पवारांनी अनेक वर्ष राज्य चालवलं आहे, पवार साहेब मातोश्रीवर आले तर त्यात आश्चर्य काय? ते यापूर्वीही मातोश्रीवर आलेले आहेत. राज्य सरकार मजूबत आहे. एकही चिरा ढळलेली नाही, हे सरकार मजबूत आहे. महाराष्ट्राच्या संकटकाळात पवारांशी चर्चा आवश्यक, 170 च्या बहुमताचं हे सरकार आहे, शरद पवारांचा सरकार स्थापनेत मोठा वाटा आहे, असं संजय राऊत म्हणाले.

काँग्रेस-राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख नेते मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत. पवार आणि मुख्यमंत्र्यांची बैठक म्हणजे महाविकास आघाडीची बैठक, ते ज्येष्ठ नेते आहेत. आमचं 170 चं बहुमत 2025-26 जोपर्यंत निवडणुका होत नाही तोपर्यंत असेल. कोणीही फुटणार नाही, फुटलं तर विरोधी पक्षाचं नशीबच फुटेल, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

Read More  देशभरात कोरोना रुग्णाची संख्या १.४५ लाखावर, २४ तासात ६५३५ नवे रुग्ण  

आकडा 180 झाला तरी आश्चर्य वाटायला नको
महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाचं भाजपचं सरकार लंडनमध्ये, न्यूयॉर्कमध्ये येऊ शकतं, तिकडे संकट गंभीर आहे, तिथे जाऊन ते राज्य निर्माण करु शकतात, अशीही टोलेबाजी त्यांनी केली.आमचं 170 चं बहुमत आहे, तो आकडा 180 झाला तरी आश्चर्य वाटायला नको. पुढल्या पाच वर्षात ठाकरे सरकारला अजिबात धोका नाही, धोका आहे तो विरोधकांना आहे, सरकारचं तुम्ही आमच्यावर सोडून द्या, तुमची काळजी घ्या, असं संजय राऊतांनी ठणकावलं.

…आधी गुजरातमध्ये राष्ट्रपती राजवट लावा
राज्यात काही कामं होत नाहीत असा आरोप करुन राष्ट्रपती राजवटीची मागणी कोणी करत असेल तर आधी गुजरातमध्ये लावावी लागेल. गुजरातमध्ये इस्पितळांची स्मशाने झालेत, अंधार कोठड्या आहेत, तिथल्या राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना बोलावून समज द्यायला हवी होती. गुजरात हायकोर्टाने सरकारवर ताशेरे ओढलेत, असं संजय राऊत म्हणाले.हे राज्य सर्वांचं आहे, राज्य संकटात असताना सर्वांनी एकत्र येणं गरजेचं, इतर राज्यात सर्वजण एकजुटीने लढत आहेत, पण महाराष्ट्रात तसं घडताना दिसत नाही, अशी खंत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या