25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeक्रीडाकॉमनवेल्थ स्पर्धेत पीव्ही सिंधूने जिंकले सुवर्णपदक

कॉमनवेल्थ स्पर्धेत पीव्ही सिंधूने जिंकले सुवर्णपदक

एकमत ऑनलाईन

भारताची पदकसंख्या ५६ वर
नवी दिल्ली : कॉमनवेल्थ बॅडमिंटन महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने कॅनडाच्या मिशेल लीविरुद्ध विजय मिळवत सुवर्णपदकाला गवसणी घातली.

या स्पर्धेत पीव्ही सिंधूनं मिशेल लीविरुद्ध २१-१५, २१-१३ असा विजय मिळवत भारताच्या झोळीत आणखी एक सुवर्णपदक घातलंय. कॉमनवेल्थ स्पर्धेतील हे भारताचे १९ वे सुवर्णपदक आहेत. तर, भारतानं आतापर्यंत या स्पर्धेत एकूण ५६ पदके जिंकली आहेत. ज्यात १५ रौप्यपदक आणि २२ कांस्यपदकांचा समावेश आहे.

यापूर्वी सिंधूने २०१४ साली राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते, तर २०१८ साली रौप्यपदकाची कमाई केली होती. त्यामुळे तिचे हे राष्ट्रकुलमधील पहिले सुवर्णपदक होते. या सामन्यात पहिला गेम सिंधूने २१-१५ असा जिंकला होता. त्यानंतर दुस-या गेममध्येही तिने दमदार कामगिरी केली आणि जेतेपद पटकावले.

सिंधूला पहिला पॉइंट घेता आला नसला तरी तिने यावेळी पहिल्या गेममध्ये आघाडी घेतली होती. सिंधूने त्यानंतर १-१ अशी बरोबरी केली. त्यानंतर सिंधूने ३-१ आणि ४-२ अशी आघाडी कायम ठेवली होती. पण त्यानंतर मिचेलने काही पॉइंट्स कमावत सिंधूच्या जवळ येण्याच्या प्रयत्न केला होता. पण सिंधूने तरीही ७-६ अशी आघाडी ठेवली होती. त्यानंतर सिंधूने आक्रमक खेळ केला आणि १५-९ अशी मोठी आघाडी पहिल्या गेममध्ये मिळवली होती. सिंधूने ही आघाडी १९-१५ अशी वाढवली आणि त्यानंतर पहिला गेम जिंकला.

सिंधूचा सामना हा कॅनडाच्या मिचेल लीबरोबर होणार होता. यापूर्वी सिंधूने सिंगापूर आणि मलेशियाच्या खेळाडूंना पराभूत केले होते. त्यामुळे तिच्याकडून यावेळी सुवर्णपदकाची अपेक्षा होती. सध्याच्या घडीला सिंधू ही चांगल्या फॉर्मात आहे. कारण या स्पर्धेपूर्वी सिंधूने सिंगापूर खुली स्पर्धा जिंकली होती. त्याचबरोबर यावेळी राष्ट्रकुल स्पर्धेत ध्वजवाहक होण्याचा दुस-यांदा मानही सिंधूला मिळाला होता. या स्पर्धेत भारताच्या संघाकडून खेळताना सिंधूने चांगली कामगिरी केली होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या