18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeआंतरराष्ट्रीयब्रिटनहून भारतात येणा-या प्रवाशांना क्वारंटाइनमधून सूट

ब्रिटनहून भारतात येणा-या प्रवाशांना क्वारंटाइनमधून सूट

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : ब्रिटनने भारतातील प्रवाशांसाठीची जाचक क्वारंटाइनचा नियम रद्द केल्यानंतर भारतानेही युकेमधून भारतात येणा-या प्रवाशांवरील क्वारंटाइनचा नियम मागे घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती देताना सांगितले की, १ ऑक्टोबर २०२१ ला भारतात येणा-या ब्रिटनच्या नागरिकांसाठी असलेली नियमावली मागे घेण्यात आली आहे.

युकेमधील नागरिकांना भारतात आल्यानंतर १० दिवसांसाठी क्वारंटाइन होणे बंधनकारक करण्यात आले होते. त्याचबरोबर ब्रिटनहून येणा-या सर्व प्रवाशांना विमानतळावर आरटी-पीसीआर चाचणी आणि भारतात आल्यानंतर आठ दिवसांनंतर पुन्हा एकदा आरटी-पीसीआर टेस्ट करावी लागणार होती.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या