जिंतूर : प्रतिनिधी
कोरोना पार्श्वभूमीवर पूण्यातील भोसरी येथून परतलेल्या एका कुटुंबातील क्वारंटाईन केलेल्या दोन वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक व दुर्दैवी घटना सोमवारी दि.१८ जिंतूर तालुक्यातील सोस-जोगवाडा या गावी घडली.
मजुरीच्या निमित्ताने पुण्यात वास्तव्यास असणाºया भोसरी येथील एक कुटुंब १४ मे रोजी मोटारसायकलद्वारे गावी परतले. तेव्हा गावक-यांनी आक्षेप नोंदवल्या नंतर या कुटुंबास जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन करण्यात आले. दोन दिवस जिल्हा परिषद शाळेत राहिल्यानंतर त्या कुटुंबियांनी त्या स्वत:घरी क्वारंटाईन राहण्याची होण्याची इच्छा दर्शविली. ते घरी परतले व घरीच क्वारंटाईन झाले.
Read More बस-ट्रकच्या अपघातात ९ जण जागीच ठार
प्रकृती चांगली नसल्याचे निदर्शनास आल्याबरोबर कुटुंबियांनी मुलास गावातील आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र जोगवाडा नेले.तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी प्रथम उपचार करून बालकाची प्रकृती गंभीर असल्याने जिंतूरला पुढील उपचारासाठी घेऊन जाण्यास सांगितले. कुटुंबियांनी धावपळ करीत तेथून त्या बालकांना जिंतूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्या डॉक्टरांनी बालकास मृत म्हणून घोषित केले. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे़
मृत मुलाचा स्वॅब पाठवला : डॉ. चांडगे
बालकाचा अहवाल आल्यानंतर त्याच्या मृत्यूचे कारण समजेल असे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ रविकिरण चांडगे यांनी दैनिक एकमत प्रतिनिधीला बोलतांना सांगीतले़