26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeमहाराष्ट्रराधेश्याम मोपलवार यांची थेट मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्ती

राधेश्याम मोपलवार यांची थेट मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्ती

एकमत ऑनलाईन

पायाभूत सुविधा प्रकल्प वॉर रुमच्या महासंचालकपदी नियुक्ती
मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांची मुख्यमंत्री सचिवालयात पुनुरुज्जीवीत करण्यात आलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्प वार रुमच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

सामान्य प्रशासन विभागाने त्यांच्या नियुकीचे आदेश जारी केले. ही नियुक्ती रुजू झाल्यापासून मुख्यमंत्र्यांचे पुढील आदेश येईपर्यंत राहणार असल्याचे या आदेशात म्हटले आहे. ते २०१८ मध्येच सेवानिवृत्त झाले होते. मात्र, त्यांच्याकडे राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून जबाबदारी दिली आणि त्यांना तब्बल ८ वेळा मुदतवाढ दिली. आता तर त्यांच्यावर मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे.

राज्यात सुरु असलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या योजनाबद्ध आणि वेगवान अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री सचिवालयात वार रूमचे पुनुरुज्जीवन करण्यात आले आहे. या वार रूमचे प्रमुख म्हणून मोपलवार हे काम पाहतील. त्यासाठी त्यांना मुख्यमंत्री कार्यालयातून बैठक व्यवस्था आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे आदेशात म्हटले आहे.

मुंबई-नागपूरला जलदगतीने जोडणा-या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाकडे आहे. फडणवीस सरकारमध्ये समृद्धीचे काम एकनाथ शिंदे यांच्याकडे होते. तेव्हापासून मोपलवार हे शिंदे यांच्या गुडबुकमध्ये होते. शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मोपलवार यांना मोठी जबाबदारी दिली जाईल, अशी चर्चा होती. त्यानुसार त्यांना पायाभूत सुविधा प्रकल्पाची जबाबदारी देण्यात आली आहे.

मोपलवार यांना
सर्वाधिकवेळा मुदतवाढ
राधेश्याम मोपलवार हे २८ फेब्रुवारी २०१८ रोजी शासन सेवेतून निवृत्त झाले होते. त्यानंतर त्यांना लगेच राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती. तेव्हापासून त्यांना आतापर्यंत सलग आठवेळा मुदतवाढ मिळाली आहे. फडणवीस आणि ठाकरे सरकारमध्ये विक्रमी मुदतवाढ मिळालेले मोपलवार हे पहिलेच अधिकारी असावेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या