22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeमहाराष्ट्रयवतमाळच्या शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग

यवतमाळच्या शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग

एकमत ऑनलाईन

यवतमाळ : यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमाला शिक्षण घेणा-या एका विद्यार्थ्याची रॅगिंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत विद्यार्थ्याच्या आईनेच महाविद्यालयाच्या अधिष्ठातांकडे तक्रार केली आहे. या घटनेने महाविद्यालय परिसरात खळबळ उडाली आहे.

नागपूर येथील हा विद्यार्थी यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालयात पदव्युत्तर पहिल्या वर्षाला शिक्षण घेत आहे. १५ दिवसांपूर्वी तो याठिकाणी आला आहे. दरम्यानच्या काळात काही विद्यार्थ्यांनी त्याची रॅगिंग घेतली. त्याला मानसिक आणि शारीरिक त्रास देण्यात आला. त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली, अशी तक्रार विद्यार्थ्याच्या आईने महाविद्यालय प्रशासनाला दिली.

विद्यार्थ्याच्या आईने आपल्या मुलाची रॅगिंग झाल्याची तक्रार अधिष्ठाता मिलिंद फुलपाटील यांच्याकडे केली आहे. वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून मुलाला मानसिक आणि शारीरिक त्रास देण्यात येत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. त्या अनुषंगाने महाविद्यालय प्रशासन आता चौकशी समिती गठित करून चौकशीला सुरुवात करणार आहे. चौकशीअंतीच नेमके काय सत्य आहे हे उघड होणार आहे.

वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून एका कनिष्ठ वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्याला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात आहे. या तक्रारीनंतर विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांमध्ये देखील वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. चौकशीअंती या प्रकरणातील सत्यता बाहेर येणारच आहे. मात्र निर्दोष विद्यार्थ्यांना या प्रकरणी विनाकारण त्रास होऊ नये, अशी चर्चा महाविद्यालयातील डॉक्टरांमध्ये सुरू आहे. अर्थातच या प्रकरणात जे दोषी आहेत त्यांच्यावर नियमांनुसार कारवाई व्हायलाच हवी, असे मत देखील काहींनी व्यक्त केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या