21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeराष्ट्रीयराहुल गांधीसह प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात

राहुल गांधीसह प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महागाई , बेरोजगारीविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात देशव्यापी आंदोलनाला सुरुवात झाली आहे.देशभरात महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्यावर काँग्रेसने आक्रमक पवित्राल घेतला आहे. दिल्ली, मुंबई, नागपूरसह देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत निषेध करण्यात येत आहे.

यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा संसद भवन ते राष्ट्रपती भवन असा मोर्चा निघणार होता. पण दिल्ली पोलिसांना काँग्रेसचा हा मोर्चा रोखला आणि आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

यावेळी दिल्ली पोलिसांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतले. यानंतर काँग्रेस कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.

केंद्र सरकारविरोधात आज काँग्रेसकडून देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली. या पार्श्वभूमीवर दिल्लीसह मुंबई आणि नागपुरातही काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मुंबई आणि नागपूरमध्येही पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली.

काँग्रेसने महागाई आणि बेरोजगारीबाबत केंद्रातील केंद्र सरकारवर आक्रमक भूमिका घेतली आहे. या आंदोलनाआधी राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला.

राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेतील दहा महत्वाचे मुद्दे

  • देशात लोकशाहीची हत्या सुरु आहे. देशामध्ये चार लोकांची हुकुमशाही सुरु आहे. सध्या देशातील परिस्थिती भयानक आहे.
  • काँग्रेसने जे ७० वर्षात कमावले ते भाजपने ७ वर्षात गमावले आहे. आम्ही एका राजकीय पक्षाशी लढत नाहीत तर आम्ही संपूर्ण पायाभूत सुविधांशी लढत आहोत.
  • जर कुणी विरोधकांना पाठिंबा देत असेल तर त्याच्या मागे ईडी आणि सीबीआय लावले जाते. त्यामुळे विरोधकांचा प्रभाव दिसत नाही.
  • अर्थमंत्र्यांना महागाई का दिसत नाही हेच कळत नाही. ते म्हणतात स्टार्टअप इंडिया आहे, सांगा कुठे आहे स्टार्टअप इंडिया. लोकांना नोकरीवरुन काढलं जात आहे.
  • सरकारचे म्हणणे आहे की, कोरोनामध्ये एकही मृत्यू झाला नाही. ५ दशलक्ष लोक मरण पावले असे संयुक्त राष्ट्र म्हणत आहे, परंतु सरकार म्हणत आहेत की हे सर्व खोटे आहे.बेरोजगारीबाबत सरकार म्हणते की यात तथ्य नाही. त्यांच्या हातात सगळी संवादाची साधनेआहेत.
  • जेवढे मी बोलेन, तेवढी माझ्यावर कारवाई केली जाईल. पण मी घाबरत नाही. आता माझ्यावर आणखी हल्ले होतील. जो धमकावतो तो घाबरत असतो. या लोकांना भारताच्या आजच्या परिस्थितीची भीती वाटते. त्यांनी दिलेल्या आश्वासनांची त्यांना भीती वाटते.
  • केंद्र सरकार लोकांच्या ताकतीला घाबरते. महागाई आणि बेरोजगारीची भीती या लोकांना आहे. हे लोक २४ तास खोटे बोलण्याचे काम करतात. राहुल गांधी म्हणाले की, केवळ काँग्रेसच नाही तर देशातील कोणताही अभिनेताकिंवा कोणीही व्यक्ती सरकारच्या विरोधात बोलला तर त्याच्यामागे संपूर्ण यंत्रणा उभी केली जाते.
  • भारतात लोकशाही संपली आहे. त्याचे परिणाम भोगावे लागतील. भारतीय जनता गप्प बसणार नाही

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या