28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रराहुल गांधी यांच्या महाराष्ट्रात दोन सभा होणार

राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रात दोन सभा होणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : काँग्रेसची भारत जोडो यात्रा आजपासून सुरू होत आहे. कन्याकुमारी येथून सुरू झालेली ही यात्रा देशभरात ३५७० कि.मी.चा प्रवास करत काश्मीर येथे संपणार आहे. या यात्रेचे नेतृत्व राहुल गांधी हे करत आहेत.

ही यात्रा देशभरातील विविध राज्यांतून जाणार आहे. यावेळी राहुल गांधी ब-याच ठिकाणी चौकसभा देखील घेणार असल्याची माहिती काँग्रेसने दिली आहे. अशातच या यात्रेदरम्यान राहुल गांधी महाराष्ट्रातही येणार आहेत. यावेळी ते हिंगोलीत येणार आहेत. राहुल गांधी जिल्ह्यामध्ये ८० कि.मी. प्रवास करतील. याचबरोबर आहाराष्ट्रामध्ये ते जळगाव जामोद आणि नांदेड येथे सभा घेणार असल्याची माहिती काँग्रेस नेते माणिकाव ठाकरे यांनी दिली आहे.

याच अनुषंगाने माणिकराव ठाकरे हे प्रशिक्षण आणि संबोधन करण्यासाठी हिंगोलीत आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना ठाकरे म्हणाले की, केंद्रातले भारतीय जनता पक्षाचे सरकार हे जनहिताचे नाही. संविधानाच्या विरोधातील आहे. संविधानाने दिलेले अधिकार संपुष्टात आणणारे सरकार त्या ठिकाणी बसलेले आहे. म्हणून या सरकारला सत्तेपासून बाजूला सारले पाहिजे, ही भूमिका जनतेची आहे.

अशोक चव्हाण काँग्रेससोबत सोडचिठ्ठी देऊन दुस-या पक्षात जाणार असल्याची चर्चा असताना काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी अशोक चव्हाण पक्ष सोडून कुठेही जाणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. ते पक्ष सोडणार, असे म्हणत त्यांच्याबद्दल अपप्रचार केला जात आहे. महाराष्ट्रातील एक नंबरचे नेतृत्व म्हणून अशोक चव्हाण यांच्याकडे बघितले जाते. ते असा विचार करूच शकणार नाहीत. विरोधी पक्ष त्यांच्याबद्दल अपप्रचार करत आहेत, असे काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या