बेंगळुरू : काँग्रेस नेते राहुल गांधी कर्नाटक दौ-यावर आहेत. राहुल यांनी कर्नाटकातील बेळगाव येथे सोमवारी काँग्रेसच्या युवा क्रांती समागमाचे उद्घाटन केले. काँग्रेस नेते राहुल गांधी सभेला संबोधित करताना सांगितले कि, कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आल्यास पदवीधराला तीन वर्षांसाठी दरमहा ३ हजार रुपये व डिप्लोमा धारकाला दरमहा १५०० रुपये देण्यात येणार. तसेच एका वर्षात २.५ सरकारी नोक-या व १० लाख खाजगी क्षेत्रात नोक-याची निर्मिती करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.
यावेळी राहुल म्हणाले, कर्नाटकात काँग्रेस सरकार आल्यावर एससी आरक्षण १५ वरून १७ टक्केकेले जाईल. एसटी आरक्षण ३ वरून ७ टक्के करण्यात येणार. कर्नाटकातील बेळगावी येथे सोमवारी राहुल गांधी म्हणाले, कर्नाटक सरकार देशातील सर्वात भ्रष्ट सरकार आहे, तुम्हाला काहीही करायचे असेल तर तुम्हाला ४० टक्के कमिशन द्यावे लागते. हा देश अदानींचा नाही तर गरीबांचा आणि शेतक-यांचा आहे.
कर्नाटकाच्या या विभागात ५० विधानसभा जागा येतात. गेल्या विधानसभा निवडणुकीत या भागातून ५० जागांपैकी भाजपने ३० जागा जिंकल्या होत्या. मात्र यावेळी लिंगायती नाराजी उघडपणे रस्त्यावर दिसून येत आहे. अशा स्थितीत राहुल गांधी यांनी बेळगावीतून निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे.
कर्नाटकच्या राजकारणात लिंगायत मतदार खूप महत्त्वाचे मानले जातात. भाजप नेते अमित शहा यांनीही वोक्कंलिंगा येथून प्रचाराला सुरुवात केली. त्याचवेळी पीएम मोदींनी आपला निवडणूक प्रचार बेळगाव पासून सुरवात झाली होती.
बेळगाव हालिंगायता समाजाचा बालेकिल्ला मानला जातो. या निवडणुकीत् लिंगायत तांचा मोठा वर्ग भाजपवर नाराज असल्याच्या चर्चा आहेत. अशा स्थितीत काँग्रेसला संधीचा फायदा घ्यायचा आहे. विशेष म्हणजे भाजप नेते बीएस येडियुरप्पा आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या विरोधात लिंगायत समाज सातत्याने निदर्शने करत आहे. गेल्या तीन दशकांत सातत्याने भाजपसोबत दिसणारा लिंगायत समाज पहिल्यांदाच भाजप विरोधात मैदानात उतरला आहे.
अशा स्थितीत लिंगायत समाजाचा विश्वास जिंकण्यासाठी ही चांगली संधी काँग्रेसपुढे चालून आली आहे. कारण बेळगावच्या लिंगायत समाजानी घेतलेला निर्णय कर्नाटकाच्या सर्व १००लिंगायतबहुल जागांवर दिसून येतो.