पुणे : पुणे पोटनिवडणुकांचा निकाल काल लागला. चिंचवड मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांचा पराभव झाला. तर भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप या विजयी झाल्या आहेत. अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना ४४ हजार मतांवर समाधान मानावे लागले. दरम्यान, मोठी माहिती समोर आली आहे. पराभूत होऊनही नाना काटे यांना दिलासा मिळाला आहे. पण राहुल कलाटे यांचे डिपॉझिट रद्द झाल्याने कलाटेंना मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, चिंचवड मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत कलाटे यांच्यामुळे नाना काटे यांना पराभव पत्करावा लागला, त्या राहुल कलाटे यांचे या निवडणुकीत डिपॉझिटच जप्त झाले आहे. हजारो मते मिळूनही डिपॉझिट जप्त झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार उमेदवारांना एकूण मतदानाच्या एक षष्ठांश मते मिळणे आवश्यक असते. मात्र काल झालेल्या मतमोजणीमध्ये राहुल कलाटे यांना ४४ हजार ११२ मते मिळाली आहेत. मतदारसंघांमध्ये २ लाख ८७ हजार मतदान झाले. यापैकी ४७ हजार ८३३ मते कोणत्याही उमेदवाराला मिळणे आवश्यक होते.