26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रराहुल शेवाळेंवर बलात्काराचा आरोप; महिलेने थेट मुख्यमंत्री शिंदेंनाच लिहिले पत्र

राहुल शेवाळेंवर बलात्काराचा आरोप; महिलेने थेट मुख्यमंत्री शिंदेंनाच लिहिले पत्र

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्यावर पोलिस गुन्हा दाखल करत नसल्याने पीडित महिलेने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. शेवाळे यांनी आपल्यावर बलात्कार करत, मानसिक त्रास दिल्याचा आरोप पीडितेने तक्रारीत केला आहे. लग्नाचे आमिष दाखवून त्यांनी आपल्यावर अत्याचार केल्याचेही या महिलेने म्हटले आहे.

शेवाळे यांचे लग्न झाले असल्याची कल्पना होती. मात्र शेवाळे यांनी पत्नीसोबत वाद होत असून लवकरच तिच्यापासून घटस्फोट घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यावर आपण विश्वास ठेवला, असेही या महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र महिलेने सोशल मीडियावर प्रसिद्ध केले असून सोबत राहुल शेवाळे तिच्या वाढदिवसाला उपस्थित असल्याचा एक व्हीडीओही पोस्ट केला आहे.

पोलिसांनी तक्रार न घेतल्यास आपल्याकडे आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांशी याबाबत संपर्क केला असता, या प्रकरणाची कुठलीही तक्रार अद्याप आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच महिलेचे हे ट्विटर अकाऊंट अधिकृत आहेत का याची खात्रीही केली जात आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी शेवाळे यांनी न्यायालयाच्या तक्रारीच्या आधारावर साकीनाका पोलिस ठाण्यात महिलेविरोधात खंडणी व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या