25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमराठवाडापरभणी जिल्ह्यात तिर्रट जुगारावर छापा

परभणी जिल्ह्यात तिर्रट जुगारावर छापा

एकमत ऑनलाईन

४९ जण ताब्यात, ३३ लाखांचा मुद्देमाल जप्त
परभणी : परभणीचे सहाय्यक पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यावरून मौजे पारवा शिवारातील परभणी ते पाथरी रोडवरील राष्ट्रमाता मॉं जिजाऊ सेवाभावी संस्था, पारवा शिवार येथे छापा टाकला. येथील पत्र्याच्या शेडवर छापा टाकून तिर्रट जुगार खेळणा-या ४९ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांनी यावेळी ३२ लाख ९२ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांच्या या कारवाईमुळे परभणी शहरातील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहेत.

परभणी जिल्ह्यात पोलीस अधीक्षक जयंत मीना व अपर पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, उप विभागीय पोलिस अधिकारी परभणी शहर, उपविभागीय पोलिस अधिकारी परभणी ग्रामीण सिरतोड यांनी अवैध धंद्यांवर कारवाई केली आहे. सहाय्यक पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांना जुगार सुरु असल्यासंदर्भात गोपनीय माहिती मिळाली होती. परभणी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजे पारवा शिवारात परभणी ते पाथरी रोडवरील राष्ट्रमाता मॉँ जिजाऊ सेवाभावी संस्था पारवा शिवार येथे पत्र्याच्या शेडवर पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी दत्तात्रय श्रीरंगराव कदम (रा. दत्तनगर, परभणी) हा लोकांना पैशावर पत्याचा जुगार खेळवताना सापडला.

यावेळी पोलिसांनी कारवाई करत एकूण ४९ आरोपींना पत्यावर जुगार खेळताना ताब्यात घेतले. पोलिसांनी कारवाईदरम्यान तिर्रट जुगार खेळण्याचे साहित्य, वाहन, मोबाईल व रोख रक्कम असा एकूण ३२ लाख ९२ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी या आरोपींविरद्ध पोलिस स्टेशन परभणी ग्रामीण येथे कलम १८८ भा.दं.वि.सह कलम ४ व ५ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे परभणीतील अवैध व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

 

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या