25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीययेस बँक प्रकरणी गोयंका, बलवा यांच्या ठिकाणांवर छापे

येस बँक प्रकरणी गोयंका, बलवा यांच्या ठिकाणांवर छापे

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : डीएचएफएल- येस बँक फसवणूक प्रकरणी केंद्रीय तपास संस्थेने (सीबीआय) मोठी कारवाई केली आहे. सीबीआयने मुंबई आणि पुण्यातील या प्रकरणाशी संबंधित संशयितांच्या आठ ठिकाणांवर आणि कार्यालयांवर छापे टाकले. या प्रकरणी सीबीआय शाहिद बलवा आणि विनोद गोयंका यांच्या परिसराची झडती घेत आहे. या छाप्यादरम्यान त्यांच्या ठिकाणाहून अनेक कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान, अलीकडेच सीबीआयने या प्रकरणाशी संबंधित बांधकाम व्यावसायिक संजय छाब्रियालाही अटक केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयच्या वेगवेगळ्या पथकांनी ही कारवाई केली आहे. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विनोद गोयंका यांच्या घरावर छापे टाकण्यात आले असतानाच दुसरीकडे मुंबईतील सीबीआयच्या अधिका-यांनी शाहिद बलवा आणि अविनाश भोसले यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयांची झडती घेतली आहे. संजय छाब्रियाच्या अटकेनंतर सीबीआयने याप्रकरणी आपली कारवाई तीव्र केली आहे.

२०१८मध्ये सुरू झाले प्रकरण
विशेष म्हणजे, फसवणुकीचे हे प्रकरण एप्रिल ते जून २०१८ दरम्यान सुरू झाले, जेव्हा येस बँकेने डीएचएफएलच्या अल्प-मुदतीच्या डिबेंचरमध्ये ३,७०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली. त्या बदल्यात वाधवांनी कपूर आणि त्यांच्या कुटुंबीयांना डीओआयटी अर्बन व्हेंचर्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडला कर्ज म्हणून ६०० कोटी रुपये दिले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या