24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeराष्ट्रीयपुढील पाच दिवसांत देशभरात पाऊस

पुढील पाच दिवसांत देशभरात पाऊस

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : ईशान्येकडील भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. यासोबतच आसाम आणि मेघालयमध्ये २ ते ४ जून या कालावधीत मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये २ जूनपर्यंत आणि अरुणाचल प्रदेशात ४ जूनदरम्यान मुसळधार पाऊस होईल. बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये वादळी वा-यासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे, अशी माहिती आयएमडीने दिली.

स्कायमेटच्या अहवालानुसार हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. उत्तराखंड, महाराष्ट्र, छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्येही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण भारतात मान्सून पुढे सरकत आहे, मात्र त्याचा वेग काहीसा कमी झाला आहे. गेल्या २४ तासांत लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार बेटांवर आणि केरळमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला.

काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली. आयएमडीच्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सूनने संपूर्ण केरळ व्यापले आहे. कर्नाटक आणि तामिळनाडूच्या काही भागासह नैऋत्येच्या अनेक भागात मान्सून पुढे सरकला आहे.

अरबी समुद्रातून येणा-या मान्सून वा-यांच्या प्रभावामुळे केरळ, लक्षद्वीपमध्ये हलका ते मध्यम आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुढील पाच दिवसांत कर्नाटकात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, पुद्दुचेरीमध्येही पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, जम्मू-काश्मीर आणि हिमाचलमध्ये एक वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार झाला आहे, ज्यामुळे पुढील तीन दिवसांत या राज्यांमध्ये काही ठिकाणी पाऊस पडू शकतो.

पश्चिम राजस्थानपासून हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहारपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. त्यामुळे हरियाणा, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेशात मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या