पुणे : राज्यावर पुन्हा परतीच्या पावसाचे सावट ओढावले असून, रविवार दि़ १८ ऑक्टोबर रोजी पुणे वेधशाळेने आगामी आठवड्यातील २०, २१ आणि २२ ऑक्टोबर रोजी राज्यात मुसळधार पावसाचे संकेत दिले आहेत. राज्यावर कोरोनाचे संकट असताना परतीच्या पावसाने आता दुहेरी संकटात पाडले आहे़ परतीच्या पावसामुळे शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेली पीकेपावसात वाहून गेली. पावसाचा जोर ओसरत नाही तोवरच पुढील आठवड्यात २०,२१ आणि २२ ऑक्टोबर तारखेला पुन्हा मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज पुणे वेधसाळेने वर्तवला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
याआधी भारतीय हवामान विभागाने १७ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रात पाऊस सक्रिय राहण्याची शक्यता वर्तवली होती. मात्र, पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्यामुळे पुढील आठवड्यात मुसळधार पाऊस होणार असल्याचे पुणे वेधशाळेने म्हटले आहे. परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतक-यांच्या भेटीसाठी तसेच, नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवार दि़ १९ ऑक्टोबर रोजी सोलापूर दौरा करणार आहेत.
प्रचाराप्रसंगी कमलनाथ यांची जिभ घसरली