23.8 C
Latur
Friday, September 24, 2021
Homeमहाराष्ट्रराज्यात पावसाचा जोर वाढणार

राज्यात पावसाचा जोर वाढणार

एकमत ऑनलाईन

पुणे: आगामी तीन चार दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे .बंगालच्या उपसागरात तयार झालेला हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली असल्यामुळे पावसाचे प्रमाण वाढणे शक्य आहे .

गेल्या आठवड्यापासून राज्याच्या काही भागात म्हणजेच मराठवाडा आणि विदर्भात पावसाने दमदार हजेरी लावली आहे .त्याचप्रमाणे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आणि घाटमाथ्यावर जोरदार पाऊस होतो आहे .धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण चांगले असल्याने पाण्याच्या पातळीतही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे . हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसात राज्याच्या विविध भागात वादळी वा-यासह जोरदार पावसाचा अंदाज आहे .

या सततच्या पावसाने मुंबईकर, पुणेकर, नाशिकरांची वर्षभराची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटवली आहे. कोयना, भंडारदरा यासारखी महत्वाची धरण ओव्हर फ्लो झाली आहे. कोयनाचे सहा दरवाचे २.६ फुटांपर्यंत उघडण्यात आले आहेत. तर पुण्यामधील पानशेत, वरसगाव, भाटघर धरणं १०० टक्के भरली आहेत.

पुणे पसिरसातील खडकवासला धरण ९७ टक्के भरलेआहे. पानशेत, भाटघर आणि वरसगाव धरणे १०० टक्के भरली असून टेमघर धरण ९९ टक्के भरले आहे. त्खडकवासलामधून ६ हजार ८४८ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. विसर्गामुळे पाणी पातळी तुलनेने मोठ्या प्रमाणात वाढणार नसली तरी नदीकाठ परिसरात सतर्क राहावे, असंही महापौरांनी स्पष्ट केलं आहे.

कोयनाचे सहा दरवाजे उघडले
कोयना धरण परिसरात पावसाचा जोर चांगलाच वाढला असून, धरणाखालील कृष्णा, कोयना नद्यांकाठीही सर्वत्र संततधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. मुसळधार पावसामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठयÞात समाधानकारक वाढ होत आहे. त्यामुळेच कोयना धरणाचे दरवाजे २.६ फुटांपर्यंत उघडण्यात आले आहे. या विसर्गामुळे पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने कोयना काठच्या गावांना सतर्कचे इशारा देण्यात आलाय.

नाशिकमधील धरणांमधून पाण्याचा विसर्ग
नाशिक जिल्ह्यांमधील धरणांमधूनही मोठ्याप्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून नांदूर मध्यमेश्वर धरणातून सर्वाधिक म्हणजेच १३ हजार क्युसेक पाणी सोडले जात आहे. गंगापूर धरणातून १ हजार ५०० तर दारणा धरणातून १२ हजार क्युसेक पाणी सोडले जात आहे. कडवा धरणामधून २ हजार २०० आणि आळंदी धरणातून ३० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या