24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeराष्ट्रीयआसाममध्ये पावसाचे रौद्ररुप

आसाममध्ये पावसाचे रौद्ररुप

एकमत ऑनलाईन

दिसपूर : अखंड सुरू असलेल्या पावसामुळे आसाममधील जनजिवन विस्कळीत झाले आहे. तब्बल ३२ जिल्ह्यांना पावसाचा फटका बसला आहे. आतापर्यंत पावसामुळे आणि दरड कोसळून तब्बल ७३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण बेपत्ता आहेत. नमागरिकांप्रमाणे जनावरांचेही प्रचंड हाल होत आहेत. आसाममधील ४२ लाख लोकांना या पूरस्थिताचा फटका बसला आहे. बचावकार्य जोरात सुरु आहे. पण मदतीसाठी आलेल्यांनाही पूराचा फटका बसत आहे.

बचावकार्यादरम्यान चार पोलिस वाहून गेले आहेत. यामधील एकाचा मृतदेह मिळाला आहे तर अन्य तीन पोलिस बेपत्ता आहेत. ३२ जिल्हे या पुराच्या पाण्यामुळे प्रभावीत झाले आहेत. पुरामुळे शेतक-यांच्या जमिनी वाहून गेल्या आहेत. शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. रस्ते पाण्याखाली गेल्याने, नागरिकांना एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी स्थलांतर करणेदेखील कठीण झाले आहे. दरम्यान, भारतीय लष्कराकडून सातत्याने मदत आणि बचावकार्य सुरु आहे.

५००० हजार गावे पाण्याखाली
सतत कोसळणा-या पावसामुळे पाच हजारांपेक्षा जास्त गावे पाण्याखाली गेली आहेत. घरामध्ये पाणी गेल्यामुळे संसार उघड्यावर आला. नागरिकांची तारांबळ उडाली असून भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकजण रस्त्यावर आले आहेत. बजाली, बक्सा, बारपेटा, बिस्वनाथ, कचरा, दारंग, धेमाजी, भुबरी, कार्बी, कोकराजसह अनेक जिल्ह्यातील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. फक्त नागरिकचे नाही, तर जनावरे आणि पक्षांचेही हाल होत आहेत. लष्कराच्या जवानांचे बचाव आणि मदतकार्य सुरुच आहे.

बचाव मोहीम युध्दपातळीवर
बचाव मोहिमेसोबतच लष्कराचे जवान हजारो लोकांना मदत करण्यासाठी मदत छावण्यांमध्ये आवश्यक वस्तूंचा वेळेवर पुरवठा सुनिश्चित करत आहेत. पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढत आहेत. संततधार पावसामुळे घरात तर पाणी गेलेच. त्याशिवाय रस्तेही खचले आहेत. लोक रस्त्यावरच जेवण करत आहेत. नागरिकांच्या मदतीसाठी एनडीआरएफ पथक कसोशीने प्रयत्न करत आहे.अनेकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.

पंतप्रधानांनी घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी येथील पूरस्थितीचा सातत्याने आढावा घेत आहेत. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा हे विविध ठिकाणच्या मदत शिबिरांत आश्रयास आलेल्या पूरग्रस्तांची भेट घेत आहेत. तेथील परिस्थितीवर मुख्यमंत्री स्वत: बारकाईने लक्ष ठेवून आहेत. मोदींनी मुख्यमंर्त्यांना फोन करून पूरस्थितीची माहिती घेतली. केंद्राकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासनही पंतप्रधानांनी दिले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या