26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeनांदेडनांदेड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार... पुर सदृश परिस्थिती, आसना पुल पाण्याखाली

नांदेड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार… पुर सदृश परिस्थिती, आसना पुल पाण्याखाली

एकमत ऑनलाईन

नांदेड : नांदेड जिल्हयात पावसाने हाहाकार उडवला असून शुक्रवारी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने पुर सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील रस्ते जलमय झाले असून शहरातील हिंगोली गेट येथील भुयारी मार्ग, नविन कौठा, पद्जासिटी परिसर जलमय झाला आहे. तर मालेगाव रस्त्यावरील पासदगावच्या आसना नदीवरील पुलावरून पाणी वाहत आहे. यासह ग्रामीण भागातील अनेक पुल पाण्याखाली गेले आहेतÞ यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या सर्व गंभीर परिस्थितीमुळे जिल्हा प्रशासन अर्लट झाले आहे.

गेल्या चार ते पाच दिवसापासून नांदेड जिल्ह्यात सतत पाऊस सुरू आहे. यात हवामान खात्याने पुढील दोन, चार दिवसात मोठा पाऊस होईल असा अंदाज व्यक्त केला होता. शुक्रवारी रात्री तो खरा ठरला. शहर परिसरासह जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पावसाने हाहाकार उडवून दिला आहे. या पावसामुळे शहरातील अनेक रस्ते जलमय झाले असून सखल भागातील नागरी वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. शहरातील हिंगोली गेट येथील भुयारी मार्ग, नविन कौठा, पद्जासिटी परिसर जलमय झाला आहे.

मालेगाव रस्त्यावरील पासदगावच्या आसना नदीवरील पुल पाण्याखाली गेल्याने पुलावरील वाहतुक बंद करण्यात आला आहे. येथुन जवळ असलेल्या एका शाळेच्या पाय-या पाण्यात बुडाल्या आहेत.
नांदेड-नागपूर महामार्गावरील नांदेडजवळील आसना नदीवील पुलाच्या काठोकाठ पाणी वाहत आहे. सध्या कोणतीही अडचण नसल्याने येथील पुलावरून वाहतुक सुरू आहे.

वसमत फाट्या जवळील मेंढला गावाजवळील पुल पुराच्या पाण्याने खचला आहेÞ यासह जिल्ह्यातील भोकर, अर्धापूर,किनवट, माहूर, मुदखेड, हदगाव, हिमायनगर,कंधार, लोहा आदी तालुक्यातही जोरदार पावस झाला आहेÞ यामुळे नदी,नाले तुंडूब भरून वाहत आहेतÞ रात्रभर झालेल्या या मुसळधार पावसाने सध्या जिल्ह्यात पुर सदृश परिस्थिती निर्माण झाली असून अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या सर्व परिस्थितीमुळे एनडीआरएफ पथक जिल्हा प्रशासन व जिल्हा पोलिस दल अर्लट झाले असून मदतीच्या कामाला लागले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या