28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्रनातवासाठी राज ठाकरे बनले फोटोग्राफर!

नातवासाठी राज ठाकरे बनले फोटोग्राफर!

एकमत ऑनलाईन

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी यंदा पहिल्यांदाच गणरायाचे आगमन झाले आहे. अमित ठाकरे यांना मुलगा झाल्याने यंदा घरी गणपती बसवल्याचे ठाकरे कुटुंबाने सांगितले आहे. दरम्यान, आक्रमक भाषणशैली आणि सडेतोड स्वभावासाठी प्रसिद्ध असलेले आजोबा राज ठाकरे आपल्या नातवासाठी फोटोग्राफरच्या भूमिकेत दिसले. प्रेमळ अंदाजात दिसून आले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे याच वर्षी काही महिन्यांपूर्वी आजोबा झाले आहेत. त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांना मुलगा झाला आहे. या मुलाचे नाव त्यांनी किआन ठेवले आहे. किआनच्या आगमनामुळे घरात उत्साहाचे, चैतन्याचे वातावरण असल्याची भावना आजोबा राज ठाकरे यांनी याआधीही व्यक्त केली होती. यंदा पुन्हा त्यांचे नातवावरचे प्रेम दिसून आले आहे.

राज ठाकरेंच्या घरी यंदा पहिल्यांदाच गणपती बसला आहे. राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी सांगितले की, यंदा आमच्या घरी बालगणेशाचे आगमन झाल्यानं घरी गणपती बसावा अशी माझी इच्छा होती, जी माझ्या घरच्यांनी पूर्ण केली आहे.

राज ठाकरे, अमित ठाकरे आणि घरातला सगळ्यात छोटा सदस्य किआन या तिघांनीही सारखेच कपडे घातले होते. यावेळी आजोबा राज ठाकरे आपल्या नातवासाठी फोटोग्राफरच्या भूमिकेत दिसले. राज ठाकरे यांनी अमित, सून मिताली आणि नातू किआन या तिघांचेही आपल्या फोनमध्ये फोटो घेतले. त्यांचे हे वेगळेच रूप सोशल मीडियावरूनही व्हायरल होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या