27.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रराज ठाकरेंनी घेतली फडणवीसांची भेट

राज ठाकरेंनी घेतली फडणवीसांची भेट

एकमत ऑनलाईन

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सागर बंगल्यावर झालेल्या दोघांच्या भेटीनं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे फडणवीसांमध्ये तासभर चर्चा रंगली. सकाळी ८ वाजता राज ठाकरे सागर बंगल्यावर दाखल झाले होते. या भेटीदरम्यान, राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला ठाकरे यादेखील उपस्थित होत्या.

आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक मनसे स्वतंत्र लढवणार की भाजपासाबोत युती करुन लढवणार, याबाबत सगळ्यांना उत्सुकता आहे. मुंबई महापालिकेतील शिवसेनेचा विजयाचा अश्वमेध रोखायचा विडाच भाजपाने उचललेला आहे. अशा स्थितीत मनसेची भूमिका महत्त्वाची असणार आहे. हिंदुत्वाच्या वाटेवर असलेले राज ठाकरे या निवडणुकीसाठी भाजपासोबत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

दोनदिवसांपूर्वी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरÞ बावनकुळे यांनी भाजपा-शिवसेनेच्या युतीत एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे पार्टनर आहेत. राज ठाकरेंनी महाराष्ट्रात घौडदोड केली तर पुढे बघू. राज ठाकरेंसोबत आमचे खूप चांगले संबंध आहेत. असे वक्तव्य केलं होतं.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या