मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर हिप बोनची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. दीड तास ही शस्त्रक्रिया चालली. दरम्यान राज ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असल्याची माहिती त्यांनी ट्विट करत दिली आहे.
आपल्या आशीर्वादाने आणि प्रार्थनेने माझी शस्त्रक्रिया व्यवस्थितरीत्या पार पडली आहे. काही वेळापूर्वीच, रुग्णालयातून बाहेर पडून मी घरी पोहोचलो आहे. आपले आशीर्वाद आणि प्रेम असेच कायम राहो! आपला नम्र.. राज ठाकरे.
अशा आशयाचे ट्विट शेअर करत राज ठाकरे यांनी डिस्चार्ज मिळाला असल्याची माहिती दिली आहे. राज ठाकरे १८ जूनला मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात दाखल झाले होते, त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. पायाचं दुखणं वाढल्यामुळे त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला होता.