26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeमहाराष्ट्रराज ठाकरे दिवाळीनंतर अयोध्येला जाणार

राज ठाकरे दिवाळीनंतर अयोध्येला जाणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्या दौ-यावर जाणार आहेत. कांचन गिरीजी आणि जगद्गुरू सूर्याचार्य यांनी राज ठाकरे यांची ‘कृष्णकुंज’वर भेट घेतली. या भेटीत राज ठाकरे यांनी अयोध्येला येण्याबाबतची इच्छा कांचन गिरीजी यांना बोलून दाखवली. कांचन गिरीजी यांनी राज यांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यातही त्यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौ-याची माहिती दिली.

राज ठाकरे यांचा डिसेंबर महिन्यात अयोध्येत येण्याचा मानस आहे. आम्ही त्यांचे स्वागत करू. राज ठाकरे यांनी हिंदू राष्ट्र मजबूत करण्यासाठीच्या कार्याला हातभार लावावा अशी विनंती आम्ही त्यांच्याकडे केली आहे. राज ठाकरे यांची हिंदू राष्ट्राबाबतची संकल्पना खूप स्पष्ट आहे, असे कांचन गिरीजी यांनी म्हटले.

राज ठाकरे यांनीही अयोध्येला जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात असून दिवाळीनंतर ते अयोध्या दौरा करण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्याच्या ५ तारखेला राज ठाकरेंचा अयोध्या दौरा होणार असल्याचे सांगितले जात आहे. हिंदू राष्ट्र मजबूत करण्यासाठी राज ठाकरेंचा अयोध्या दौरा अतिशय महत्त्वाचा आहे, असे सांगितले जात आहे.

दरम्यान, कांचन गिरीजी आणि जगद्गुरू सूर्याचार्यची यांनी राज ठाकरे यांची भेट घेण्यापूर्वी शिवाजी पार्कवरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर ते ‘कृष्णकुंज’वर दाखल झाले. राज ठाकरेंच्या भेटीनंतर कांचन गिरीजी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राज ठाकरे यांच्या मनात परप्रांतियांविरोधात कोणताही द्वेष नाही हे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवले, असे कांचन गिरीजी म्हणाल्या. राज ठाकरेंच्या हिंदू राष्ट्राच्या संकल्पना खूप स्पष्ट आहेत आणि स्थानिक रोजगाराच्या मुद्यांवर ते बोलत असतात. परप्रांतियांबद्दल कोणत्याही पद्धतीचा द्वेष मला त्यांच्या बोलण्यातून जाणवला नाही, असे त्या म्हणाल्या.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या