मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर आज हीप बोनची शस्त्रक्रिया होणार आहे. त्यासाठी मनसैनिकांकडून मुंबईत महाआरती आणि पूजेचं आयोजन करण्यात आलं आहे. राज ठाकरे यांची शस्त्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडावी आणि त्यांना उत्तम आरोग्य मिळावे यासाठी गणेश मंदिरात पूजा आणि हनुमान मंदिरात महाआरतीचं आयोजन करण्यात आलं आहे. मनसे कर्मचारी सेनेतर्फे महाआरतीचं आयोजन करण्यात आलं आहे.
मनसे अध्यक्ष यांची जूनच्या पहिल्या आठवड्यात शस्रक्रिया होणार होती. पण त्यांना कोरोनाची लागण झाल्यावर त्यांची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. आता आज लीलावती रूग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. त्यांना काल काही चाचण्या करण्यासाठी लीलावतीत दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान त्यांना त्यांना उत्तम आरोग्य लाभावे यासाठी कार्यकर्त्याकडून आरती करण्यात आली आहे.
राज ठाकरे हे ५ जूनला आयोध्या दौरा करणार होते पण त्यांना अचानक हीपबोनचा त्रास होऊ लागला होता त्यामुळे त्यांनी हा दौरा रद्द केला. त्यानंतर त्यांची जूनच्या पहिल्याच आठवड्यात हीपबोनची शस्त्रक्रिया होणार होती पण त्यांना कोरोनाची लागण झाली आणि शस्त्रक्रिया पुढे ढकलली. त्यानतंर त्यांची आज लीलावती रूग्णालयात शस्त्रक्रिया पार पडणार आहे.