23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमहाराष्ट्रराज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटणार, आज संध्याकाळी ‘वर्षा’वर जाणार

राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटणार, आज संध्याकाळी ‘वर्षा’वर जाणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वरचेवर होणा-या भेटी मनसे-भाजप युतीचे द्योतक ठरत आहेत. अशात युतीचा महत्त्वपूर्ण भाग असलेले, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांचीही जवळीक वाढत आहे.

याआधी मुख्यमंत्री राज ठाकरेंच्या ‘शीवतीर्थ’ या निवासस्थानी गणपतीच्या दर्शनासाठी गेले होते. आता राज ठाकरे ‘वर्षा’ बंगल्यावर जात शिंदेंची भेट घेणार आहेत. गणेशोत्सव सुरू आहे. त्यामुळे मुख्यमंत्री निवासस्थानातील गणरायाचं दर्शन घेण्यासाठी राज ठाकरे जाणार आहेत.

सध्या राज ठाकरे-शिंदे-फडणवीस यांच्यातील वाढती जवळीक पाहता युतीची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हिंदुत्वाच्या मुद्यावर ही युती होईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या