27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमहाराष्ट्रअयोध्या दौ-यातून राज ठाकरेंची माघार

अयोध्या दौ-यातून राज ठाकरेंची माघार

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी ५ जूनचा नियोजित अयोध्या दौरा रद्द केला आहे. प्रकृतीचे कारण देत त्यांनी हा दौरा रद्द केला आहे. पण ते पुण्यात २२ मे ला सभा घेऊन याविषयीचे बोलतील, असे सांगण्यात येत आहे.

दरम्यान संजय राऊतांनी आपल्याला माध्यमातूनच याविषयीची माहिती समजल्याचे म्हणत जर राज ठाकरेंना मदतीची गरज असेल तर आम्ही दिली असती. तिकडे शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे. उत्तर प्रदेशच्या जनतेने नेहमीच शिवसेनेचे स्वागत केले आहे. काय अडचण आहे माहित नाही, पण भाजपाने त्यांच्यांशी असे वागायला नको होते असा टोलाही त्यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.

दौ-याला यूपीत विरोध
शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे मात्र १५ जूनला अयोध्या दौ-यावर जाणार असल्याचे राऊतांनी सांगितले आहे. राज ठाकरेंच्या अयोध्या दौ-याला उत्तर प्रदेशमधील भाजपाचे खासदार बृजभूषण सिंग यांनी विरोध केला होता. उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय. अयोध्येत पाय ठेवू देणार नाही, अशी भूमिका बृजभूषण यांनी घेतली होती. दरम्यान राज ठाकरेंनी नियोजित अयोध्या दौरा रद्द केला आहे. या दौ-यांची मोठी तयारी करण्यात आली होती. रेल्वेदेखील बूक करण्यात आल्या होत्या.

पुण्यातल्या सभेत उत्तर देणार
पुण्यातील २२ मे रोजी होणा-या सभेत राज ठाकरे अयोध्या दौ-याविषयी बोलतील असे सांगण्यात येत आहे. राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना पुण्यातील सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. पण प्रकृती अस्वास्थ्यामुळेच हा दौरा रद्द केल्याचे सांगत असले तरी, अयोध्या दौ-याला उत्तर प्रदेशात होत असलेल्या विरोधामुळेच दौरा रद्द केल्याचे सांगितले जात आहे.

याआधी रद्द केलेले निर्णय
राज ठाकरेंनी पहिल्यांदा एखाच्या ठरलेल्या गोष्टीविषयीची भूमिका बदललीय असं नाही. यापूर्वीही त्यांनी घेतलेले अनेक निर्णय ऐनवेळेस बदललेत. मशिदीवरील भोंग्याच्या संदर्भात राज ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतली होती, मशिदीसमोर हनुमान चालिसा पठणा करत आंदोलन करण्यात येत होते.

तर ३ मे ला अक्षयतृतीया आणि रमजान ईदच्या दिवशी जागोजागी महाआरती घेण्यात येणार होती. मात्र ऐनवेळेस त्यांनी महाआरती करÞण्याचा कार्यक्रम रद्द केला होता. त्यांच्या यू-टर्ननंतर राजकीय चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान राज ठाकरेंच्या सभा आणि त्यांच्या कार्यक्रमांमध्ये राज ठाकरे हिंदूजननायक असा उल्लेख होऊ लागला, तसेच त्यांनी पांघरलेल्या भगव्या शालीची देखील चर्चा झाली होती.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या